‘द कपिल शर्मा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ हा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 11 जूनपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाने ‘द कपिल शर्मा’ रिप्लेस केले आहे. ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ या कार्यक्रमात पूरन सिंह आणि शेखर सुमन परिक्षकाच्या भूमिकेत आहेत.
‘स्ट्रेस का करने चूरमा, आ रहे हैं कॉमेडी के सुरमा!’ अशी ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे. या कॉमेडी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना विनोदाची वेगवेगळी अंग पाहायला मिळणार आहेत. स्टॅंड अप, मिमिक्रीपासून स्किट्स आणि विनोदी कवितांपर्यंत अनेक गोष्टी ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धक या कार्यक्रमातील मानाची ट्रॉफी मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे.
अनेक वर्षांनंतर प्रेक्षकांना ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ सारखा विनोदी कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. राजपाल यादव आणि सुगंधा मिश्रा हेदेखील परिक्षकांना मदत करताना दिसणार आहेत. हा कार्यक्रम वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब करत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. हा कार्यक्रम पुढील तीन महिने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.