मुंबई, 26 एप्रिल : मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2022 जितके वाईट होते तशीच काहीशी सुरुवात यंदाच्या हंगामातही झालीय. सुरुवातीचे सामने गमावल्यानंतर सलग तीन सामने मुंबईने जिंकले. मात्र त्यानंतर पुढच्या दोन सामन्यात मुंबईची अवस्था दयनीय झाली. इतकंच नाही तर आय़पीएलच्या इतिहासात पहिल्यांदा मुंबई इंडियन्सने सलग दोन सामन्यात 200 हून जास्त धावा दिल्या.
आयपीएलच्या 15 वर्षांच्या इतिहासात जे झालं नाही ते आय़पीएलच्या 16 व्या हंगामात पाच वेळा विजेता असलेल्या मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केलंय. परदेशी गोलंदाजीवर मदार असणाऱ्या मुंबई इंडियन्सची सलग दोन सामन्यात धुलाई झाली. पंजाब किंग्जने मुंबई विरुद्ध 214 धावा केल्या. तर गुजरात टायटन्सने 207 धावा केल्या. यामुळे दोन्ही सामन्यात मुंबईला पराभवाचा धक्का बसला.
IPL 2023 MI vs GT : गुजरातच्या मैदानावर मुंबईचा लाजिरवाणा पराभव, गुजरातने नोंदवला पाचवा विजय
आयपीएल 2023 चा अर्धा टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. सर्व संघांनी त्यांचे 7-7 सामने खेळले आहेत. सध्याच्या स्थितीत मुंबई इंडियन्सची गोलंदाजी सर्वात खराब आहे. मुंबई इंडियन्सचा डेथ ओव्हर्समध्ये इकॉनॉमी रेट हा 12.45 इतका आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाइट रायडर्स असून त्यांचा इकॉनॉमी रेट 11.26 इतका आहे. आरसीबीने 10.95, दिल्लीने 10.61 तर पंजाब किंग्जने 10.43 च्या इकॉनॉमी रेटने धावा केल्या आहेत.
दरम्यान, गुजरातविरुद्ध मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर गुजरातकडून शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा हे दोघे मैदानात उतरले. गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलने 56, हार्दिक पांड्या 13, विजय शंकर 19, डेविड मिलर 46, अभिनव मनोहरने 42 तर राहुल तेवाटियाने 20 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून पियुष चावलाने 2 विकेट्स तर अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, जेसन बेहरेनडॉर्फने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.
गुजरात टायटन्सने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स देऊन 207 धावा केल्या तर मुंबईला विजयासाठी 208 धावांचे आव्हान दिले. मुंबई इंडियन्सकडून ईशान शर्माने 13, कॅमेरन ग्रीनने ३३, सूर्यकुमार यादवने 23, नेहाला वधेराने 40, पीयूष चावलाने 18 तर अर्जुन तेंडुलकरने 13धावा केल्या. उर्वरित कोणत्याही फलंदाजाला मुंबईसाठी दोन अंकी धाव संख्या करता आली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.