मुंबई, 08 एप्रिल : भारताच्या कसोटी संघात राहुल द्रविडनंतर आता चेतेश्वर पुजाराला भिंत म्हणून ओळखलं जातं. सध्या आयपीएलचा ‘रनसंग्राम’ सुरू असताना चेतेश्वर पुजारा मात्र इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहे. पुजाराला ससेक्सने कर्णधार केलं आहे. त्याने डरहॅमविरुद्ध काउंटी चॅम्पियनशिपमध्ये डिव्हिजन टू सामन्यात दुसऱ्या दिवशी शतक झळकावलं. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलच्या पार्श्वभूमीवर काउंटी क्रिकेटमध्ये पुजाराचं शतक महत्त्वाचं म्हटलं जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाय यांच्यात अंतिम सामना जून महिन्यात होणार आहे.
चेतेश्वर पुजाराने काउंटी क्रिकेटमध्ये 133 चेंडूत शतक झळकावलं. यात त्याने 12 चौकार आणि एक षटकारही मारला. डरहॅमने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 376 धावा केल्या. डरहॅमकडून मायकल जोन्सने सर्वाधिक 87 धावा केल्या तर कर्णधार एलेक्स लीसने 79 धावा केल्या.
IPL 2023 Point Table : लखनऊने गुजरातला टाकलं मागे, तीन संघ अद्याप विजयाच्या प्रतीक्षेत
भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने काउंटीच्या गेल्या हंगामात धावांचा पाऊस पाडला होता. त्याने ससेक्सकडून खेळताना 8 सामन्यात 1 हजार 94 धावा केल्या होत्या. पुजारा ससेक्सकडून गेल्या वर्षी पहिल्यांदाच खेळला होता. त्याने संघाकडून पदार्पणातच जबरदस्त कामगिरी केली होती.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी अंतिम सामना 8 जूनला होणार आहे. या सामन्याआधी पुजाराचे शतक भारताला दिलासा देणारं असं आहे. पुजाराने नुकतंच ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत शंभरावा कसोटी सामना खेळला होता. त्याने भारताकडून आतापर्यंत 102 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत पुजाराने 19 शतकांच्या मदतीने 7154 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 51 धावा आहेत.
पुजाराने आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त 30 सामने खेळले आहेत. यात त्याला 390 धावा करता आल्यात.आय़पीएलमध्ये तो 2021 मध्ये चेन्नईच्या संघात होता. मात्र 2022 आणि 2023 मध्ये त्याला कोणत्याच संघाने घेतलं नाही. तर त्याने आयपीएलमध्ये अखेरचा सामना 2014 मध्ये खेळला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.