मुंबई, 18 मे : यंदाचा आय़पीएल हंगाम अखेरच्या टप्प्यात आला असून लीग फेरीतील काहीच सामने शिल्लक राहिले आहेत. या हंगामाचे डिजिटल स्ट्रिमिंग पार्टनर जिओ सिनेमा आहे. जाहिरात खर्चात जिओ सिनेमा वर्चस्व गाजवत आहे. एकूण जाहिरातीमध्ये जिओ सिनेमाचा दोन तृतियांश वाटा आहे.
JioCinemaची रिअल टाइम नंबर्स ट्रॅकिंग सिस्टिम जाहिरातदारांना मूल्यांकनासाठी उपुयक्त ठरते. तसंच जास्ती जास्त लोक आयपीएल या प्लॅटफॉर्मवरून पाहत आहेत. यामुळे जाहिरात खर्चाचं प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास तिप्पट आहे. यंदाच्या हंगामात आयपीएल डिजिटल स्ट्रिमिंग दरम्यान प्रायोजकांची संख्यासुद्धा तब्बल २६ वर पोहोचलीय. आतापर्यंत कोणत्याही खेळाच्या स्पर्धेतली ही सर्वोच्च संख्या आहे.
Viacom18 Sports चे CEO अनिल जयराज यांनी JioCinema च्या वाढत चाललेल्या प्रभावावर बोलताना म्हटलं की, डिजिटल हा प्रत्येकासाठी पर्याय आणि संधी आहेत. जिओ सिनेमाच्या माध्यमातून जाहिरातदार त्यांच्या योग्य अशा प्रेक्षकांपर्यंत, ग्राहकांपर्यंत पोहोचतायत. अनेक लहान जाहिरातदार, ब्रँड आणि कंपन्याना यामध्ये सहभागी होण्यासाठी एक व्यासपीठ मिळालं. याशिवाय जिओकडे सीटीव्हीवर ४० पेक्षा जास्त जाहिरातदार आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय ब्रँड, आर्थिक सेवा, ई कॉमर्स, ऑटो, B2C, B2B यांसारख्या ब्रँडचा समावेश आहे. आठवड्यागणिक कनेक्टेड टीव्ही जाहिरातींचे स्पॉटही वाढत चालले असल्याचं जिओ सिनेमाच्यावतीने सांगण्यात आलं.
BCCIचा महत्त्वाचा निर्णय, पाकिस्तानला बसणार मोठा दणका
जिओ सिनेमाच्या नव्या कल्पनांबाबत बोलताना टाटा मोटर्स ईव्हीचे चिफ मार्केटिंग ऑफिसर विवेक श्रीवास्तव म्हणाले की, आयपीएल पाहण्याच्या अनुभवात जिओ सिनेमाने मोठी क्रांती घडवून आणलीय. फ्री एक्सेस आणि अत्याधुनित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 4k स्ट्रिमिंग, मल्टीकॅम, अनेक भाषांचे पर्याय यामुळे आतापर्यंत कधीही घडलं नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे. तसंच जाहिरात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरण्यात आलेल्या नव्या कल्पनांमुळे go.ev आणि Tiago.ev सोबत फक्त शहरातच नाही तर लहान नागरी भागातही पोहोचू शकली. या पार्टनरशिपमधून आम्ही भारतातील केवळ शहरी भागात नव्हे तर लहान शहरे, गाव याठिकाणीही पोहोचण्यास सक्षम झालो. या पार्टनरशिपमधून आम्ही पुढेही वाटचाल करू इच्छितो आणि भारतातील ईव्ही वापरात अशीच वाढ होईल अशी अपेक्षा करतो.
मॅडिसन डिजिटलचे सीईओ विशाल चिंचणकर यांनी म्हटलं की, आमच्या ग्राहकांना खूप चांगला अनुभव आला. अनेक जाहिरातींच्या कॅम्पेनवर जबरदस्त असा प्रभाव दिसून आला. काही वेळा असंही झालं की आमच्या ग्राहकांनी आय़पीएलसाठी डिजिटल माध्यमावर पुन्हा गुंतवणूक केली.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या TAM अहवालानुसार सीटीव्ही जाहिरात स्पॉटमध्ये २० टक्के वाढ झालीय. कनेक्टेड टीव्हीवर यंदाच्या आयपीएलने एचडी टीव्हीपेक्षा दुप्पट प्रेक्षकसंख्येचा आकडा गाठला. यातून सीटीव्ही प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सुविधा आणि प्रेक्षकांची आवड दिसून येते.
Jaquar Groupचे जरनल मॅनेजर आणि मार्केटिंग कम्युनिकेशनचे हेड संदीप शुक्ला यांनी सीटीव्ही जाहिरातींबाबत म्हटलं की, जिओ सिनेमाचे सीटीव्ही हे चांगल्या दर्जाचं 4K स्ट्रिमिंग, अनेक भाषांचा पर्याय देणारं भारतातीय प्रेक्षकांसाठी एक व्यासपीठ आहे. जाहिरातदार त्यांच्या ब्रँडची माहिती लोकांमध्ये व्हावी यासाठी आणि क्रिकेटप्रेमींसोबत कनेक्ट राहण्यासाठी या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतात. आयपीएल सामन्यांवेळी इतक्या प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याची आणि जिओ सिनेमाच्या सीटीव्ही प्लॅटफॉर्मसोबत ब्रँड वाढवण्यासाठी ही एक मोठी आणि चांगली संधी आहे.
यंदाच्या आयपीएलमधून ५५० मिलियन डॉलर्स इतकी कमाई होईल असा अंदाज मीडिया पार्टनर्स एशियाने व्यक्त केला आहे. यात ६० टक्क्यांहून जास्त वाटा हा डिजिटलचा असेल. आय़पीएलच्या पहिल्या पाच आठवड्यात जिओ सिनेमा १३०० कोटींपेक्षा जास्त व्हिडिओ व्हूजपर्यंत पोहोचलं आहे. यंदाचे आयपीएल पाहणाऱ्या एकूण प्रेक्षकांपैकी ७३ टक्के प्रेक्षक हे जिओ सिनेमावर आयपीएल पाहत असल्याचं Synchronise आणि Unomer च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.