मुंबई, 18 एप्रिल : आयपीएल 2023 मधील 25 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना होणार असून यात दोन्ही संघ विजयाची हॅट्रिक घेण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. परंतु या सामन्यात जुळे भाऊ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार असून आयपीएलच्या इतिहासात असे प्रथमच घडणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटर मार्को जॅनसेन आणि दुआन जॅनसेन ही दोन्ही भावंडं यंदा आयपीएल 2023 मध्ये खेळत आहेत. मार्को जॅनसेन याला सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल ऑक्शनमध्ये 4.20 कोटी रुपयांना खरेदी केले. तर दुआन जॅनसेनला मुंबई इंडियन्स ने 20 लाखांना खरेदी केले होते. काही दिवसांपूर्वी दुआन जॅनसेनने मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यासामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
आयपीएलच्या इतिहासात प्रथमच जुळी भावंडं एकमेकांविरुद्ध सामना खेळणार असून याबाबत सध्या क्रीडा विश्वात बरीच चर्चा सुरु आहे. मार्को जॅनसेन याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 12 सामने खेळले असून यात तब्बल 13 विकेट्स घेतल्या आहेत. तर हा आयपीएलमध्ये 1 सामना खेळला असून यात त्याने 1 विकेट घेतली आहे. मंगळवारी 18 एप्रिल रोजी हे जुळे भाऊ एकमेकांच्या टीम विरुद्ध कशी कामगिरी करतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.