अहमदाबाद, 14 एप्रिल : गतविजेत्या गुजरात टायटन्सने आयपीएलच्या १८ व्या सामन्यात पंजाब किंग्जचा ६ विकेटने पराभव केला. गुजरातने आतापर्यंत ४ सामन्यापैकी ३ सामने जिंकून ६ गुण मिळवले आहेत. पॉइंट टेबलमध्ये ते तिसऱ्या स्थानी आहेत. तर पंजाब किंग्ज इलेव्हनने चारपैकी दोन सामने गमावले आहेत. गुजरातविरुद्धच्या सामन्यात पंजाबकडून खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या कगिसो रबाडाने मोठ्या विक्रमाची नोंद केली.
कगिसो रबाडा गुरुवारी यंदाच्या हंगामातील त्याचा पहिला सामना खेळला. या सामन्यात पाचव्या षटकात चौथ्या चेंडूवर त्याने गुजरातचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला बाद केलं. या विकेटसह रबाडा आयपीएलमध्ये सर्वात वेगवान १०० विकेट घेणारा गोलंदाज बनला. त्याने ही कामगिरी फक्त ६४ डावात केली. यासह रबाडाने श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला. मलिंगाने ७० डावात ही कामगिरी केली होती.
IPL 2023 : एम एस धोनी ते गौतम गंभीर, या खेळाडूंनी मारले आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब Six
हर्षल पटेल याबाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. हर्षलने १०० विकेट घेण्याची कामगिरी ७९ सामन्यात केली होती. तर अनुभवी वेगवान गोलंदाद भुवनेश्वर कुमारने ८१ सामन्यात हा टप्पा गाठला होता. गुजरातचा अनुभवी फिरकीपटू राशिद खान ८३ डावात अशी कामगिरी करत पाचव्या स्थानी आहे.
दरम्यान, गुजरात टायटन्सने शुभमन गिलच्या ६७ धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबवर १ चेंडू आणि ६ गडी राखून विजय मिळवला. पंजाबच्या संघाने अडखळत सुरुवात झाल्यानंतरही ८ बाद १५३ धावा केल्या. तर शुभमन गिलच्या अर्धशतकी खेळीनंतरही गुजरातला विजयासाठी अखेरच्या षटकापर्यंत झुंजावे लागले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.