मुंबई, 5 एप्रिल : आयपीएल 2023 ला सुरुवात होऊन काहीच दिवस झाले असताना आता दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडिया इनफ्लून्सर सपना गिल हिच्यावर कथित हल्ला केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल झाली असून आता ऐन आयपीएल सुरु असताना पृथ्वीला यामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
15 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या आंतरराज्य एअरपोर्टच्या जवळील एका हॉटेलच्या बाहेर सेल्फी काढण्याच्या वादातून पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यात वाद झाला होता. यादरम्यान पृथ्वी शॉने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप सपना गिलने केला होता. तसेच यावेळी सपना गिल आणि तिच्या मित्रांनी पृथ्वी शॉव बसलेल्या गाडीवर हल्ला करून त्याची काच देखील फोडली होती. या विरोधात पृथ्वी शॉने सपना गिल आणि तिच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी या प्रकरणी त्यांना अटक देखील केली होती.
हे ही वाचा : क्रिकेटपटू पृथ्वी शॉला मारहाण करणारी सपना गिल नेमकी आहे तरी कोण?
सपना गिलने या कारवाई विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. सपना गिलने अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात पृथ्वी शॉ विरोधात तक्रार दाखल केली असून पृथ्वी आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्याची तक्रारीत मागणी केली आहे. सपना गिलने दाखल केलेल्या तक्रारी प्रकरणी 17 एप्रिलला न्यायालयात सुनावणी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.