प्रशांत बाग, प्रतिनिधी
मुंबई, 13 एप्रिल : सेलिब्रेटीमधील छोटासा वादही मोठ्या चर्चेत येतो. तसेच सोशल मीडियामुळं तो वाढतच जातो. असाच चर्चेतला वाद म्हणजे क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्लुन्सर सपना गिल या दोघांमधील आहे. या दोघांत झालेल्या वादात पृथ्वी शॉच्या तक्रारीनं अडचणीत आलेल्या सपना गीलने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
तसेच आपल्या विरोधातील दाखल गुन्हा रद्द करावी, अशी मागणी तिने केली होती. या मागणीची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली असून क्रिकेटर पृथ्वी शॉसह फिर्यादी आणी तपास अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. तसेच याप्रकरणी उत्तर सादर करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
तुमच्या शहरातून (मुंबई)
मुंबईच्या एका पबमध्ये भांडण झालेले हे प्रकरण आहे. सपना गिलने पृथ्वी शॉ सोबत हुज्जत घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याच प्रकरणात ओशिवरा पोलीस ठाण्यात सपना गिल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता हाच गुन्हा रद्द करण्यासाठी सपना गिलने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे सपना गिलने, अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टातही पृथ्वी आणि पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी देखील याचिका दाखल केली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे ?
मुंबईत एका मोठ्या हॉटेलबाहेर हा सर्व वाद झाला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये 8 जणांवर गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला आहे. संबंधित तरूणीने आरोप केला आहे की, पृथ्वी शॉ यानेच तिच्यावर आणि तिच्या मित्रांवर हल्ला केला. पृथ्वी शॉ त्याचे मित्र आशिष आणि ब्रिजेशसोबत एका हॉटेलमध्ये डिनरसाठी गेला होता. जिथे सेल्फीवरून काही मुला-मुलींसोबत त्याचे भांडण झाले. शॉ याने आधी सेल्फी दिला. मात्र, परत सेल्फी घ्यायला आल्यावर त्याने आपण जेवण करत असल्याचे सांगत सेल्फी दिला नाही. शॉ याने नकार दिल्याने तिथे भांडण झाले. दरम्यान, न्यायालयाच्या या आदेशानंतर आता IPL सुरू असताना पृथ्वी शॉला धक्का बसला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.