बंगळुरू, 25 एप्रिल : सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 34 वा सामना झाला. मात्र पहिल्यांदाच एका सामन्यात दोन्ही संघांतील एकही फलंदाज अर्धशतक झळकावू शकला नाही. दोन्ही संघांनी पूर्ण 20 षटके खेळून काढली, पण कुणालाच अर्धशतक करता आले नाही. सर्वाधिक धावा मंयक अग्रवालने केल्या. त्याने 49 धावांची खेळी केली पण सनरायजर्स हैदराबादला विजय मिळवता आला नाही.
दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 144 धावा केल्या. दिल्लीकडून मनिष पांडे आणि अक्षर पटेल यांनी सर्वाधिक धावा केल्या. दोघांनी प्रत्येकी 34 धावांची खेळी केली. संघाच्या फक्त 144 धावा झाल्याने सनरायजर्स हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. मात्र दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी कमाल करत हैदराबादला 7 धावांनी धूळ चारली.
RCBने मॅच जिंकली पण विराटसह संघाला मोठा दणका, बंदीच्या कारवाईचा धोका
सनरायजर्सचा संघ 145 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला तेव्हा त्यांची सुरुवात चांगली झाली. 69 धावात 2 विकेट गेल्या होत्या. मात्र यानंतर फलंदाजी ढेपाळली. हैदराबादकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 39 चेंडूत 49 धावा केल्या. तर हेनरिक क्लासेनने 31 धावा काढल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.