मुंबई, 31 मार्च : आयपीएल 2023 च्या सिझनला सुरूवात झाली आहे. पहिलाच सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. आयपीएलच्या नव्या मोसमासाठी प्रत्येक टीमनेच सरावाला सुरूवात केली आहे. आयपीएल इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम असलेल्या मुंबईसाठी मागचा मोसम निराशाजनक होता. आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर होती. ही कामगिरी सुधारण्यासाठी रोहितची टीम मैदानात उतरणार आहे.
मुंबई इंडियन्सचा पहिला सामना रविवारी 2 एप्रिलला आरसीबीविरुद्ध आहे. बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना होईल. त्याआधी मुंबईने सरावाला सुरूवात केली आहे. मुंबई इंडियन्सच्या सरावाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मुंबईचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर कर्णधार रोहित शर्माला बॉलिंग टाकताना दिसत आहे.
मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये जोफ्रा आर्चर रोहित शर्माला तीन बॉल टाकताना दिसत आहे. आर्चरने टाकलेल्या या तीनही बॉलमध्ये रोहित शर्मा संघर्ष करताना पाहायला मिळत आहे.
रोहितने शेवटच्या क्षणी बाहेर काढलं ट्रम्पकार्ड, बुमराहची रिप्लेसमेंट आहे तरी कोण?
आयपीएल 2022 च्या लिलावात मुंबईने जोफ्रा आर्चरला विकत घेतलं होतं, पण दुखापतीमुळे आर्चर खेळू शकला नव्हता. या मोसमात मात्र आर्चर खेळण्यासाठी सज्ज आहे. जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत जोफ्रा आर्चरवर जास्त जबाबदारी असणार आहे.
“Post bowling video Admin” – Presenting Jofra चा पहिला over in MI colors 😍💙#OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL @JofraArcher MI TV pic.twitter.com/h2Y1KvEV1O
— Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.