मुंबई : IPL 2023 चे सामने रंगात आले आहेत, अत्यंत चुरशीचे आणि अटीतटीचे सामने होत असताना अनेक खेळाडू या हंगामात जखमी झाले आहेत. चेन्नई विरुद्धच्या सामन्याआधी लखनऊ टीमला दुहेरी धक्का बसला आहे. के एल राहुल पाठोपाठ आणखी एक स्टार खेळाडू टीममधूनच नाही तर आयपीएलमधून बाहेर पडला आहे.
लखनऊ सुपर जायंट्सचा बॉलर जयदेव उनाडकट आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो सामना खेळू शकला नाही. मात्र आता तो या मोसमात पुनरागमन करू शकणार नाही अशी माहिती मिळाली आहे. उनाडकटच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे.
KL Rahul Health Update : दुखापतीमुळे के एल राहुल IPL मधून आऊट, दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडुला जॅकपॉट?
रिपोर्टनुसार, तो नेटमध्ये सराव करताना जखमी झाला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी उनाडकट तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. त्यांच्याबद्दल अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. उनाडकट या मोसमात केवळ 3 सामने खेळला आहे. यादरम्यान त्याला एकही विकेट घेता आली नाही. मात्र याआधी त्याने अनेकवेळा चमकदार कामगिरी केली आहे.
जयदेव उनाडकट गेल्या रविवारी नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करत होता. त्यावेळी त्याला दुखापत झाली. आयपीएलच्या ट्विटरवर त्याचा व्हिडिओही ट्विट केला होता. आता क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार तो या मोसमात खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे.
IPL 2023 : आशिष नेहराच्या मुलाने केली वडिलांची नक्कल, गुजरात टायटन्सने शेअर केला Video
दुखापतीमुळे उनाडकट IPL मधून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामन्यापूर्वी तो फिट होईल अशी अपेक्षा आहे. उनाडकटला लवकरच बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवले जाऊ शकते. सध्या तो उपचारासाठी मुंबईला गेल्याची माहिती मिळाली आहे.
लखनऊ सुपर जायंट्स : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, आवेश खान, अमित मिश्रा
चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मथिशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश तिक्षाणा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.