मुंबई, 8 एप्रिल : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात हायव्होल्टेज सामना सुरु आहे. आरसीबी विरुद्ध आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात पराभूत झालेली मुंबईत इंडियन्स होम ग्राउंडवर विजयी पताका लावण्यासाठी मैदानात झुंज देत आहे. दरम्यान कसोटी आणि वनडे क्रिकेट प्रमाणेच सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म हा टी 20 क्रिकेटमध्येही सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
तब्बल 2 वर्षांनी मुंबई इंडियन्सचा संघ त्यांचे होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचा सामना खेळत आहे. या सामन्यात धोनीने टॉस जिंकून चेन्नईसाठी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. धोनीच्या संघाने त्याचा हा निर्णय योग्य ठरवत मुंबई इंडियन्सच्या एका मागोमाग एक मोठ्या विकेट घेतल्या. सुरुवातीला तुषार देशपांडेने चौथ्या ओव्हरमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याची विकेट घेतली. त्यांनंतर लगेचच सातव्या ओव्हरमध्ये ईशान किशनची विकेट घेण्यात रवींद्र जडेजाला यश आले. ईशान किशननंतर मिस्टर 360 अशी ओळख असलेला सूर्यकुमार यादव मैदानात उतरला. परंतु त्याने खेळ सुरु करण्याआधीच त्याची विकेट पडली.
सूर्यकुमार क्रीजवर आला तेव्हा चेन्नईकडून सॅन्टनर गोलंदाजी करीत होता. सॅन्टनरने सूर्यकुमारला बॉल टाकला आणि काहीही कळण्याच्या आतच तो बॉल सूर्यकुमारच्या हाताला लागून पाठीमागे विकेटकिपींग करत असलेल्या एम एस धोनीने पकडला. यावेळी धोनीने विकेटसाठी अपील केले परंतु मैदानातील अंपायरने या बॉलला व्हाईट करार दिला. मात्र धोनीने यावर रिव्ह्यूची मागणी केली. तिसऱ्या अंपायरने तपासले असता रिव्ह्यूमध्ये सूर्यकुमारच्या हाताला बॉल लागून गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अखेर सूर्यकुमार यादवला 2 बॉलवर 1 धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
IPL 2023 : ग्रीनचा बुलेट शॉट, जडेजाचा सनसनाटी कॅच, Video
मागील अनेक महिन्यांपासून सूर्यकुमार खराब फॉर्ममधून जात आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या वनडे मालिकेतील तीनही सामन्यांमध्ये तो 0 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर लगेलचच सुरु झालेल्या आयपीएल मध्ये त्याचा हा दुष्काळ संपेल अशी अपेक्षा होती. परंतु आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना सलग दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार फ्लॉप ठरला आहे. मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून चेन्नई सुपरकिंग्स समोर विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.