मुंबई, 17 मे : आयपीएल 2023 च्या लीग स्टेजच्या शेवटच्या आठवड्याला सुरूवात झाली आहे, पण अजूनपर्यंत फक्त गुजरातच प्ले-ऑफमध्ये पोहोचली आहे. तर दिल्ली आणि हैदराबादची टीम प्ले-ऑफमधून आधीच बाहेर झाली आहे. त्यामुळे उरलेल्या तीन स्थानांसाठी अजून 7 टीममध्ये रेस सुरू आहे.
राजस्थान आणि केकेआरच्याही प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचा आशा अत्यंत धूसर झाल्या आहेत. या दोन्ही टीमनी 13 पैकी 6 मॅच जिंकल्या असून 7 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. उरलेला एक सामना जिंकला तरी या दोन्ही टीम जास्तीत जास्त 14 पॉईंट्सवर जाऊ शकतात.
प्ले-ऑफचं गणित
13 पैकी 9 विजय आणि 4 पराभवांमुळे गुजरात 18 पॉईंट्ससह प्ले-ऑफमध्ये पोहोचली आहे. चेन्नई आणि लखनऊच्या खात्यात 13 मॅचसह 15 पॉईंट्स तर मुंबईकडे 13 सामन्यात 14 पॉईंट्स आहेत. आरसीबी आणि पंजाबचे 12 मॅचमध्ये 12 पॉईंट्स आहेत.
मुंबईचा रस्ता कठीण
लखनऊविरुद्धच्या सामन्यातल्या पराभवामुळे मुंबईचा रस्ता आणखी कठीण झाला आहे. मुंबईला आयपीएल प्ले-ऑफमध्ये पोहोचायचं असेल तर त्यांना हैदराबादविरुद्धचा शेवटचा सामना जिंकावा लागेल. याचसोबत आरसीबी आणि पंजाबचा उरलेल्या दोन पैकी एका सामन्यात पराभव व्हावा, अशी प्रार्थना मुंबईला करावी लागेल. मुंबईने शेवटचा सामना जिंकला आणि आरसीबी-पंजाबलाही दोन्ही सामन्यांमध्ये यश मिळालं, तरी मुंबईचं प्ले-ऑफचं स्वप्न भंगेल, कारण रोहितच्या टीमचा नेट रनरेट आरसीबी-पंजाबपेक्षा खराब आहे.
मुंबईचा शेवटचा सामना हैदराबादविरुद्ध आहे, तर आरसीबीचे दोन सामने हैदराबाद आणि गुजरातविरुद्ध आहेत. पंजाब त्यांचे दोन सामने दिल्ली आणि राजस्थानविरुद्ध खेळणार आहे.
दुसरी शक्यता
पंजाब आणि आरसीबीने त्यांच्या उरलेल्या दोन्ही मॅच जिंकल्या आणि मुंबईनेही शेवटची मॅच जिंकली तरीही या तीनही टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकतात, पण यासाठी चेन्नई आणि लखनऊला त्यांची उरलेली मॅच गमवावी लागेल, यामुळे या दोन्ही टीम 15 पॉईंट्सवरच थांबतील. चेन्नईचा शेवटचा सामना दिल्लीविरुद्ध तर लखनऊचा शेवटचा सामना केकेआरविरुद्ध आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.