चेन्नई, 04 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी सोमवारी आयपीएलच्या सहाव्या सामन्यात अखेरच्या षटकात फलंदाजीला आला. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध धोनीने दोन षटकार मारले आणि तो तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. दरम्यान, चेन्नईविरुद्धच्या सामन्यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर असलेल्या गौतम गंभीरच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. यावरून आता गंभीर ट्रोल होत आहे.
प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाकडून अखेरच्या षटकात आपल्या गोलंदाजाची झालेली धुलाई पाहून गंभीर नाराज होणं स्वाभाविक होतं. मात्र चाहत्यांनी त्याच्या नाराजीला 2 एप्रिलशी जोडलं आहे. २०११ मध्ये याच दिवशी वर्ल्ड कप फायनल झाली होती आणि या सामन्यात धोनीने षटकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केले होते. त्याच सामन्यात गौतम गंभीरनेही जबरदस्त खेळी केली होती. पण आजही चाहत्यांच्या मनात धोनीने मारलेल्या षटकाराच्या आठवणी ताज्या आहेत.
IPL 2023 : पहिल्याच आठवड्यात JioCinemaचा रेकॉर्ड, CSKvsGT सामन्यावेळी विक्रमी प्रेक्षक
Ms dhoni on , 2 sixes back to back
12 runs #GOAT #CSKvLSG #badoni #MSDhoni #MSDhoni #gambhir #KLRahul #Chepaukstadium #Chepauk pic.twitter.com/3Yz7tdbw0p
— Vishal sharma PTI (@PtiVishal) April 3, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.