मुंबई, 7 मे : आयपीएल 2023 चा मोसम आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे, पण प्ले-ऑफची रेस आणखी रोमांचक झाली आहे. रविवारच्या डबल हेडरच्या निकालांमुळे पॉईंट्स टेबलमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. रविवारच्या पहिल्या सामन्यात गुजरातने लखनऊचा तर हैदराबादने राजस्थानचा पराभव केला. आयपीएलच्या 10 पैकी 9 टीममध्ये प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी तगडी स्पर्धा रंगली आहे. रविवारच्या सामन्यात हैदराबादने राजस्थानला धूळ चारल्यामुळे ही स्पर्धा आणखी थरारक झाली आहे.
आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात 11 मॅचमध्ये 8 विजय आणि 3 पराभवांमुळे 16 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर चेन्नईने 11 पैकी 6 मॅच जिंकल्या आणि 4 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली, त्यामुळे 13 पॉईंट्ससह चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर लखनऊने 11 पैकी 5 विजय आणि 5 पराभव पत्करले, तर त्यांचाही एक सामना रद्द झाला, त्यामुळे लखनऊच्या खात्यात 11 पॉईंट्स आहेत, म्हणून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
राजस्थान, आरसीबी, मुंबई आणि पंजाब यांनी 10 पैकी 5 मॅच जिंकल्या तर 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. नेट रनरेटमुळे या टीम चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत.
कोलकाता, हैदराबाद आणि दिल्लीने 10 पैकी 4 मॅच जिंकल्या तर 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला, त्यामुळे त्यांच्याकडेही प्रत्येकी 8 पॉईंट्स आहेत. या तीन टीमही नेट रनरेटमुळे शेवटच्या तीन क्रमांकावर आहेत.
या पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर फक्त गुजरातची टीमच प्ले-ऑफमध्ये सहज पोहोचण्याची शक्यता आहे. उरलेल्या तीन जागांसाठी अजूनही 9 टीममध्ये स्पर्धा रंगणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.