बँगलोर, 26 एप्रिल : केकेआरविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा 21 रनने पराभव झाला आहे. केकेआरने दिलेल्या 201 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 179 रनच करता आले. विराट कोहलीने सर्वाधिक 54 रन केले, तर महिपाल लोमरोरने 34 आणि दिनेश कार्तिकने 22 रनची खेळी केली. केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर सुयष शर्मा आणि आंद्रे रसेल यांना प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं.
या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर केकेआरने 20 ओव्हरमध्ये 200/5 एवढा स्कोअर केला. जेसन रॉयने 29 बॉलमध्ये 56 रनची खेळी केली. कर्णधार नितीश राणाने 48 रन आणि व्यंकटेश अय्यरने 31 रनची खेळी केली. आरसीबीकडून विजयकुमार व्यशक आणि वानिंदू हसरंगाने 2-2 विकेट घेतल्या.
पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबी पाचव्या क्रमांकावर तर केकेआर सातव्या क्रमांकावर आहे. आरसीबीने 8 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत, तर 4 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. दुसरीकडे केकेआरने 8 पैकी 3 मॅच जिंकल्या आणि 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.