मुंबई, 9 मे : विराट कोहलीसोबतचा वाद अफगाणिस्तानचा फास्ट बॉलर नवीन उल हकने जास्तच वैयक्तिक घेतला आहे. नवीनला हा वाद संपवायचा नाही का? असा प्रश्न विराटचे चाहते विचारत आहेत. नवीन उल हक हॉटेल रूममध्ये बसून मुंबई आणि आरसीबी यांच्यातली मॅच बघत होता. या सामन्यात विराट कोहली लवकर आऊट झाला. जेसन बेहरनडॉर्फने विराटला 1 रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यानंतर नवीन उल हकने विराटला डिवचलं आहे. नवीनने इन्स्टाग्राम स्टोरीवर पियुष चावलाचा फोटो शेअर करत विराटवर निशाणा साधला.
नवीन उल हकने इन्स्टाग्राम स्टोरीवर आंबा खातानाचा फोटो शेअर केला आहे. यात समोर टीव्ही स्क्रीनवर मुंबई-आरसीबी सामन्यावेळी पियुष चावला दिसत आहे. या स्टोरीवर नवीन उल हकने ‘स्वीट मँगोज’ असं कॅप्शन लिहिलं आहे. विराटची विकेट आपण एन्जॉय केल्याचं नवीनने अप्रत्यक्षपणे त्याच्या स्टोरीतून सांगितलं आहे. नवीन उल हकच्या या पोस्टनंतर विराट कोहलीचे चाहते मात्र चांगलेच संतापले आहेत.
naveen ul haq taking subliminal shots at virat kohli pic.twitter.com/cTEZ9yV6w0
— Arjun* (@mxtaverse) May 9, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.