मुंबई, 21 एप्रिल : आयपीएल 2023 ला 31 मार्च पासून सुरुवात झाली आहे. नेहमी प्रमाणेच यंदाच्या आयपीएलमध्ये देखील रोमांचक सामन्यांचा आनंद प्रेक्षकांना घेता येत आहे. यंदाच्या आयपीएलचे दुसरे सत्र आता काहीच दिवसात सुरु होणार आहे. तेव्हा बीसीसीआयने टाटा आयपीएल 2023 च्या अंतिम आणि प्ले ऑफ सामन्यांचे ठिकाण जाहीर केले आहे.
बीसीसीआयने शुक्रवारी सायंकाळी ट्विट करत आयपीएल 2023 चे अंतिम आणि प्ले ऑफ सामने कोठे होणार या संदर्भात माहिती दिली आहे. 31 मार्च रोजी आयपीएलच्या 16 व्या सीजनची सुरुवात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयमवर करण्यात आली होती. त्याच प्रकारे आयपीएल 2023 चा शेवटचा सामना देखील 28 मे 2023 रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवरच होणार आहे. हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असून यात तब्बल 1 लाख प्रेक्षक एकत्र बसून सामना पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.
🚨 NEWS 🚨
BCCI Announces Schedule and Venue Details For #TATAIPL 2023 Playoffs And Final.
Details 🔽https://t.co/JBLIwpUZyf
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.