चेन्नई, 10 मे : चेन्नई सुपरकिंग्सच्या स्पिनर्ससमोर दिल्लीच्या बॅटिंगने गुडघे टेकले आहेत, त्यामुळे सीएसकेने घरच्या मैदानात 27 रनने विजय मिळवला आहे. चेन्नईविरुद्धच्या या पराभवासोबतच दिल्लीचं प्ले-ऑफमध्ये खेळण्याचं स्वप्न जवळपास संपुष्टात आलं आहे. आता उरलेल्या तीनही सामन्यांमध्ये दिल्लीचा विजय झाला तरी त्यांचे जास्तीत जास्त 14 पॉईंट्स होतील, त्यामुळे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीला आता दुसऱ्या टीमवर अवलंबून राहावं लागणार आहे.
या सामन्यातमध्ये सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 167/8 एवढा स्कोअर केला. गायकवाडने 24, रहाणेने 21, दुबेने 25, रायुडूने 23, जडेजाने 21 आणि धोनीने 20 रनची खेळी केली. दिल्लीकडून मिचेल मार्शला 3 आणि अक्सर पटेलला 2 विकेट मिळाल्या. खलील अहमद, ललित यादव आणि कुलदीप यादव यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीची सुरूवात अत्यंत खराब झाली. डेव्हिड वॉर्नर पहिल्याच ओव्हरला दोन बॉलमध्ये शून्य रन करून आऊट झाला. वॉर्नरनंतरही दिल्लीला लागोपाठ धक्के लागले, यानंतर राईली रुसो आणि मनिष पांडे यांनी दिल्लीची बॅटिंग सावरण्याचा प्रयत्न केला, पण यात त्यांना यश आलं नाही. रुसोने 35 तर मनिष पांडेने 27 रनची खेळी केली. दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून फक्त 140 रन करण्यात आले.
चेन्नईकडून पथिराणाला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या तर दीपक चहरने 2 आणि रवींद्र जडेजाने एक विकेट मिळवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.