मुंबई, 15 मे : आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 61सामने खेळण्यात आले आहेत. पण अद्याप एकही संघ अधिकृतपणे प्लेऑफमध्ये पोहचलेला नाही. रविवारी रात्री केकेआरने चेन्नई सुपर किंग्जला हरवल्याने इतर संघांना फायदा झाला. कोलकाता नाइट रायडर्सने धोनीच्या संघाला त्यांच्या घरच्याच मैदानात 6 गडी राखून हरवलं. केकेआरचा यंदाच्या हंगामातील हा सहावा विजय आहे. आता 12 गुणांसह ते पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानी पोहोचले आहेत.
केकेआरला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी खूप कमी आहे. पण तरीही संघ अखेरपर्यंत जिद्दीने खेळत आहे. चेन्नईचा संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. पण चेन्नईचे जास्तीत जास्त 17 पॉइंटच होऊ शकतात. त्यामुळे पुढच्या सामन्यांमध्ये चेन्नई टॉप 2 मध्ये राहण्याची शक्यता कमी आहे.
IPL 2023 CSK vs KKR : सुनील गावसकरांनी घेतला MS Dhoni चा ऑटोग्राफ, मैदानावर नेमकं काय घडलं?
मुंबई, लखनऊला फायदा होणार
चेन्नईच्या पराभवाने मुंबई आणि लखनऊला फायदा झाला. दोन्ही संघांनी त्यांचे अखेरचे सामने जिंकले तर ते टॉप 2 मध्ये पोहोचतील. त्यामुळे फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोनवेळा संधी मिळेल.
All eyes on the !
At the end of Match 6️⃣1️⃣ of #TATAIPL 2023, here’s how the Points Table stands!
Which position is your favourite team on currently? pic.twitter.com/WWqob5cAA1
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.