मोहाली, 20 एप्रिल : भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोकप्रिय अशा आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पण यातच आज मोहालीमध्ये पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील आयपीएल-2023 सामन्यात गुरुवारी मोठा बदल दिसून आला. आरसीबी संघाचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस नाणेफेकीच्या वेळी मैदानात उतरला नाही. त्याच्या जागी कर्णधारपदाची जबाबदारी धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीवर सोपवण्यात आली आहे.
या सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांचे कर्णधार बदलले. आरसीबीचे नेतृत्व विराट कोहलीकडे असताना सॅम कॅरेनकडे पंजाबची कमान होती. सॅम कॅरेननेही नाणेफेक जिंकून बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. शिखर धवन अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही, असे सॅमने टॉसच्या वेळी सांगितले.
IPL 2023 : होम ग्राऊंडवरच राजस्थानची घसरगुंडी, लखनऊचा रोमांचक विजय
विराट कोहलीने सांगितले कारण –
नाणेफेक गमावल्यानंतर विराट म्हणाला, ‘फाफ कदाचित आज क्षेत्ररक्षण करू शकणार नाही. त्यामुळे तो वैशाक सोबत स्विच करेल आणि प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळेल. आम्हालाही प्रथम फलंदाजी करायची होती. तसेच खेळपट्टी नंतर मंद होऊ शकते. एकावेळी एक सामना घेऊन तुमच्या खेळावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. याशिवाय संघात कोणताही बदल नाही, अशी माहिती त्याने यावेळी दिली.
रॉयल चैलेंजर्स बैंगलोर (Playing 11): विराट कोहली (कप्तान), फाफ डु प्लेसी, महिपाल लोमरोर, ग्लेन मैक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदु हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, हर्षल पटेल, वेन पार्नेल और मोहम्मद सिराज
पंजाब किंग्स (Playing 11): अथर्व तायडे, मैथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंह भाटिया, लियाम लिविंगस्टोन, सैम करेन (कप्तान), जीतेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत बरार, नाथन एलिस, राहुल चाहर और अर्शदीप सिंह.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.