आदित्य कुमार, प्रतिनिधी
नोएडा, 9 एप्रिल : भारतातील लोकप्रिय असलेली आयपीएल स्पर्धा सुरू झाली आहे. क्रिकेटप्रेमींसाठी ही स्पर्धा म्हणजे एक पर्वणीच असते. त्यामुळे क्रिकेटप्रेमी आयपीएल पाहण्यासाठी पासेस किंवा तिकीट शोधतात. मात्र, तिकीटांच्या जास्त किमतीमुळे जर तुम्ही स्वस्त तिकीटांच्या शोधात असाल आणि काही जुगाड करत असाल तर सावध होणे आवश्यक आहे, कारण सायबर हल्ले करणारे तुमचं नुकसान करू शकतात.
आयपीएलच्या हंगामात सायबर गुन्हेगार सक्रिय होतात आणि स्वस्त तिकिटे आणि मोफत पास देण्याच्या नावाखाली फसवणूक करतात. तुम्ही अशा गुन्हेगारांना कसे टाळू शकता आणि तुमच्यासोबत असे काही घडल्यास तुम्ही काय करावे? याबाबत जाणून घेऊयात. अतिरिक्त पोलिस आयुक्त नोएडा (नोएडा पोलीस) शक्ती अवस्थी यांनी याबाबतची दिली. त्या सायबर गुन्ह्यांमध्ये तज्ञ आहेत.
शक्ती अवस्थी म्हणतात की, जेव्हा जेव्हा आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) येते तेव्हा क्रिकेट रसिक मोफत किंवा स्वस्त आयपीएल तिकिटांच्या शोधात असतात. अशा स्थितीत याचा फायदा घेत सायबर गुन्हेगार तुमचे खाते रिकामे करतात.
शक्ती अवस्थी सांगतात की, अशा परिस्थितीत गुन्हेगार बनावट वेबसाईट तयार करतात आणि लोकांना आमिष दाखवून फसवणूक करतात. अशा स्थितीत लोभात अडकू नये. ऑफरवर सहज उपलब्ध असलेली कोणतीही गोष्ट टाळणे आवश्यक आहे.
बनावट वेबसाइट कशी ओळखायची –
आयपीएस शक्ती अवस्थी सांगतात की, असे गुन्हेगार मूळ वेबसाइट कॉपी करतात. म्हणूनच जर तुम्हाला URL मध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला स्पेलिंग चुकीचं दिसेल. बनावट वेबसाईटवर क्लिक करून फोन हॅक करून किंवा ऑफर देऊन पैसे उकळल्याची अनेक प्रकरणे जिल्ह्यात उघडकीस आली आहेत.
अधिकृत वेबसाइट, मोबाईल ऍप्लिकेशनच वापरा. सायबर गुन्हेगार त्यांची कार्यपद्धती बदलत राहतात, आता आयपीएल सुरू आहे, म्हणून फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुमच्यासोबत असे काही घडले तर तुम्ही ताबडतोब 1930 सायबर क्राईम हेल्पलाइन नंबरवर कॉल करा आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जा, असेही ते सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.