मुंबई, 21 मे : आयपीएलच्या लीग स्टेजमध्ये अद्याप दोन सामने बाकी असून प्लेऑफमध्ये तीन संघ पोहोचले आहेत. आता एका जागेसाठी तीन संघांमध्ये चुरस बघायला मिळत आहे. आज प्लेऑफचा अखेरचा संघ ठरणार आहे. लीग स्टेजमधील अखेरच्या सामन्यात प्लेऑफमधला चौथा संघ कोण हे समजेल. आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात बंगळुरूत अखेरचा सामना होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स यांनी अखेरचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं.
लखनऊ आणि चेन्नईचे गुण समान होते पण रनरेटच्या जोरावर चेन्नई दुसऱ्या स्थानी पोहोचले. आता क्वालिफायर एकमध्ये त्यांचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्ससोबत होणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत असणारे तीन संघ म्हणजे आरसीबी, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे आहेत. या तिन्ही संघांचे भवितव्य शेवटच्या दोन सामन्यात काय होतं त्यावर आहे.
मुंबई-आरसीबी जिंकल्यास….
मुंबई इंडियन्स आणि आरसीबी या दोन्ही संघांनी त्यांचे अखेरचे सामने जिंकल्यास गुण समान होतील. पण अशा परिस्थितीत आरसीबीला फायदा होईल. त्यांचा रनरेट मुंबईपेक्षा चांगला असून ते प्लेऑफमध्ये पोहोचतील. आरसीबीने गुजरातला एका धावेने जरी हरवलं तरी दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्सला सनरायजर्सविरुद्धचा सामना किमान 79 धावांनी जिंकावा लागेल. मुंबईने मोठ्या फरकाने सामना जिंकला तर आरसीबीसाठी समीकऱणे बदलतील. लीग फेरीतील अखेरचा सामना तेच खेळणार आहेत.
मुंबई किंवा आरसीबीपैकी एक संघ जिंकला तर…
सध्या आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांचे गुण समान आहेत. दोन्हीपैकी एक संघ जिंकला तर ते सहज प्लेऑफमध्ये पोहोचतील. मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर सनरायजर्सवर मोठा विजय मिळवणं या पर्यायाशिवाय आरसीबीचा अखेरच्या सामन्यात पराभव हेच समीकरण आहे.
मुंबई आणि आरसीबी दोन्हींचा पराभव झाल्यास…
राजस्थान रॉयल्सलासुद्धा प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. जर मुंबई आरसीबीचा अखेरच्या सामन्यात पराभव झाला तर या दोन्ही संघासह राजस्थानचे गुण समान राहतील. यामध्ये मुंबईचा रनरेट कमी असल्याने ते स्पर्धेतून बाहेर जातील. तर आरसीबीचा संघ मोठ्या फरकाने पराभूत झाल्याच राजस्थानला प्लेऑफचं तिकिट मिळू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.