मुंबई, 09 मे: भारतीय रेल्वेत नोकरीची संधी आहे. Indian Railway Catering And Tourism Corporation Ltd ने एका रिक्त पदासाठी अर्ज मागवले आहेत. IRCTC रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार निवडलेल्या उमेदवाराची 3 वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केली जाईल. निवडलेल्या उमेदवाराला 2,80,000 रुपयांपर्यंत मासिक पगार मिळेल. अर्ज करणारे उमेदवार 55 वर्षांपेक्षा कमी वयाचे असावेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी पोस्टद्वारे सर्व संबंधित कागदपत्रांसह योग्यरित्या भरलेले अर्ज पाठवावे. यासाठीचे अधिक तपशील जाणून घेऊयात. याबद्दल ‘स्टडी कॅफे’ने वृत्त दिलंय.
पदाचे नाव व रिक्त जागा
IRCTC रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, ग्रुप जनरल मॅनेजर (E8) / जनसंपर्क आणि कॉर्पोरेट को-ऑर्डिनेशन या पदासाठी फक्त 1 जागा रिक्त असून ती भरली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता व अनुभव
उमेदवार मंत्रालयं, विभाग, पीएसयू, सेमी गव्हर्नमेंट,अर्धशासकीय किंवा इतर सरकारमध्ये काम करणारे गट ‘अ’ मधील अधिकारी असावेत. वर दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांचे पे स्केल असावे. सार्वजनिक डोमेनमधील कॉर्पोरेट इमेजिंग, पब्लिक रिलेशन फंक्शन, इन-हाउस कम्युनिकेशन, न्यूजलेटर्स व इतर पब्लिकेशन्सचं डिझायनिंग आणि प्रॉडक्शन, मीडिया मॅनेजमेंट, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मास मीडियाचे ज्ञान तसंच जाहिरात क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 55 वर्षांपेक्षा कमी वयाचे असावेत.
पगार
निवड झालेल्या उमेदवाराला मासिक पगार 37400-67000 GP-10000 (6CPC)/Level-14 (7 CPC), CDA पॅटर्ननुसार मिळेल. -UR- Rs.37400-67000 GP-8700 (6CPC)/Level-13 (7CPC), CDA पॅटर्न. तसेच किमान तीन वर्षांच्या सेवेसह 8700 GP/Level-13. -किंवा- Rs. 120000- 280000 (3 PRC), IDA पॅटर्न किंवा समतुल्य.
कार्यकाळ
उमेदवाराची निवड तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी केली जाईल.
अर्ज कसा करायचा
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी सर्व संबंधित कागदपत्रांसह योग्यरित्या भरलेला अर्ज पोस्टाद्वारे पाठवावा लागेल. अर्जाची अॅडव्हान्स कॉपी deputation@irctc.com वर मेलद्वारे पाठवावी.
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता
HR/Personnel Dept. to GGM/HRD, IRCTC Corporate Office, 12th Floor, Statesman House, Barakhamba Road, New Delhi- 110001.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज 9 जून 2023 रोजी किंवा त्यापूर्वी पोहोचला पाहिजे. अपूर्ण अर्ज किंवा शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.