अधिवेशनवरून जयंत पाटलांनी राज्यसरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोनासारखी स्थिती नसताना ही सरकारची अधिवेशन घेण्यास टाळाटाळ सुरु असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीवर शिवसेनेच्या आमदारांना घ्यायला हवे अशी मागणी सर्वपक्षीयांनी केल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या महाविकास आघाडीसंबंधीच्या विधानावर ही त्यांनी भाष्य केले.
नाना पटोले यांनी महाविकास आघाडी नैसर्गिक आघाडी नसल्याचे सांगत जर कोणी ऐकत नसेल तर आघाडीत थांबण्यात काय अर्थ असा सूर आवळला आहे. त्यावर आता महाविकास आघाडीचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकी झाल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी तसेच आघाडीतील मित्र पक्षांनी ही या बैठकीला हजेरी लावल्याची माहिती पाटील यांनी दिली.