Karnataka Election 2023 Results Live Updates: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी झालेल्या मतमोजणीला राज्यभरातील 36 केंद्रांवर सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत निकालाबाबत स्पष्ट चित्र निवडणूक अधिकाऱ्यांना अपेक्षित आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस व्यतिरिक्त JD(S) यांच्यात मुख्य लढत होणार असून या पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. निवडणूक आयोगाने सांगितले की, राज्यभरातील 36 केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे.
अधिकृत सूत्रांनी सांगितलं की, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्यभरात विशेषत: मतमोजणी केंद्रांमध्ये आणि आसपासच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यात 10 मे रोजी झालेल्या 224 सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत 73.19 टक्के विक्रमी मतदान झाले होते. बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीच्या लढतीचा अंदाज असल्याने दोन्ही पक्षांचे नेते निकालाकडे उत्सुक आहेत.