मुंबई, 13 मे : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपला मतदारसंघ शिगांवचा गड कायम राखला आहे. बोम्मई यांनी काँग्रेसचे उमेदवार अहमद खान यांचा पराभव केला आहे. मात्र, कर्नाटकची सत्ता गमवण्याची नामुष्की बोम्मई यांच्यावर आली आहे.
संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. काँग्रेसने कर्नाटकमध्ये जोरदार मुसंडी मारली असून स्वबळावर सत्ता स्थापन करेल असं चित्र निर्माण झालं आहे. सत्ताधारी भाजपला इथं मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या जागांमध्ये मोठी घसरण झाली आहे. अजूनही मतमोजणी सुरू आहे. पण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काँग्रेसचे यासिर अहमद खान पठान आणि जेडीएसचे शशीधर चन्नबसप्पा यलीगर यांचा पराभव केला आहे. शिगगांव मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एसआर बोम्मई यांचा मुलगा 2008 पासून सलग याच मतदासंघातून विजयी होत आले आहे. यावेळी चौथ्यांदा ते निवडणुकीसाठी उभे होते. त्यांनी सहज विजय मिळवला आहे. राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या पदावर असलेल्या बसवराज यांनी 2021 मध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे. कर्नाटकचे ते 17 वे मुख्यमंत्री ठरले होते.
सेमीफायनल की फायनल?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात बाकी पक्षांना मागे टाकून काँग्रेस बहुमताच्या जवळ दिसत आहे. तसं, विधानसभेच्या निवडणुकीत जेव्हा जेव्हा राष्ट्रीय पक्षाचा पराभव होतो, तेव्हा ते हे निकाल लोकसभा निवडणुकीपासून वेगळे असल्याचं सांगू लागतात. पण इतिहासही एक गोष्ट सांगत असतो. गेल्या तीन निवडणुकांच्या आकडेवारीवरून असं दिसून येतं की, कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर कोणताही परिणाम होत नाही. मात्र असाही दावा केला जात आहे, की ही परिस्थिती यंदा बदलेल. आता प्रश्न असा आहे, की हे खरंच शक्य आहे का?
(Explained : दक्षिण भारत हातातून जाणार, लोकसभा निवडणुकीवर परिणाम; पराभव झाल्यास भाजपला हे धक्के)
केंद्र सरकारच्या कारभाराला चार वर्षे होत आहेत, अशा स्थितीत या कारभारावर आपण खूश आहोत की नाही, असा विचार अनेकांनी नक्कीच केला असेल. अशा स्थितीत एका वर्षात किती बदल होतील आणि जनमानसात कितपत बदल होईल. राजकीय वर्तुळात हा शब्दप्रयोग खूप लोकप्रिय आहे की सार्वत्रिक निवडणुकीच्या एक वर्ष आधीपर्यंत झालेल्या सर्व विधानसभा निवडणुका या सेमीफायनल मॅचसारख्या असतात आणि सार्वत्रिक निवडणुका अंतिम सामन्यासारख्या असतात.
गेल्या 3 कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल पुढील लोकसभा निवडणुकीच्या निकालांपेक्षा पूर्णपणे वेगळे असल्याचे जाणकारांचे मत आहे. यावरून कर्नाटकातील मतदार विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकांना पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने पाहतात. अशा परिस्थितीत दोघांची तुलना करणे योग्य ठरणार नाही, कारण राजकारणात 10 दिवसांत कल उलटू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.