नवी दिल्ली : कर्नाटका निवडणुकीचं बगुल वाजलं प्रचार सभा रंगल्या आरोप प्रत्यारोप झाले आणि आता जनतेला निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.
आज सकाळी 7 वाजेपासून मतदान सुरू होईल, जे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करण्यात येणार आहे. निवडणुकीनंतर 13 मे रोजी मतमोजणी करण्यात येणार येणार आहे. कर्नाटकात कोणाचे सरकार येणार याचा निर्णय तर अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
कर्नाटकात कुणाला मत द्यायचं? राज ठाकरेंनी मतदारांना केलं आवाहन
या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, सत्ताधारी भाजपा (भाजपा) यांच्यासह मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शेवटपर्यंत प्रचार केला. त्याच वेळी, काँग्रेस आणि जेडीएसनेही निवडणूक मोहिमेमध्ये पूर्ण ताकद लावली आहे.
‘कर्नाटकमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळणार’; अमित शाहांचा दावा, मुस्लीम आरक्षणावरुन काँग्रेसवर निशाणा
या निवडणुकीसाठी एकूण 75 हजार 603 मतदान युनिट्स , 70 हजार 300 कंट्रोल युनिट्स (सीयू) आणि 76,202 व्हीव्हीपीएटी वापरल्या जातील. शांततेत निवडणुका आयोजित करण्यासाठी राज्यात कठोर व्यवस्था करण्यात आली आहे. शेजारच्या राज्यांमधील सुरक्षा दलांनाही निवडणुकीदरम्यान सुरक्षेसाठी बोलवण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.