Karnataka Election 2023 Voting Live News Update: कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी बुधवारी मतदान होत आहे. येथे सत्तेत असलेली भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रस दोन्ही पक्षांचे नेता विजयाचा दावा करीत आहे. दरम्यान एक्झिट पोलमध्ये कोणाच्या पारड्यात यश पडणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
2018 मध्ये काय झालं होतं?
2018 च्या 12 मे रोजी कर्नाटकात मतदान झालं होतं. 15 मे रोजी निकाल घोषित करण्यात आला होता. कोणत्याही पार्टीचा पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. तेव्हा भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. भाजपचे 104 उमेदवार विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या 80 आणि जेडीएसचे 37 उमेदवार निवडणुकीत विजयी झाले होते. त्यावेळी एग्झिट पोलचे दावे खरे ठरले होते. इंडिया टुडे एक्सिस माय इंडिया, टाइम्स नाउ- VMR और इंडिया टीवी-वीएमआर व्यतिरिक्त सर्व एजन्सींनी भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरल्याचा दावा केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.