गाव-खेड्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने पक्षपाताचे राजकारण बाजूला सारून क्षेत्रातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता कोट्यवधींचा विकासनिधी उपलब्ध करून दिला आहे. उपलब्ध झालेल्या विकासनिधीतुन ब्रम्हपुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये नळपाणी पुरवठा योजना, व रस्त्यांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडत आहे.
याप्रसंगी प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, माजी जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी जि.प. सदस्या स्मिता पारधी, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले यांसह विविध गावांतील सरपंच, काॅंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
सलग दोन वर्षे महाविकास आघाडी सरकारला वैश्विक महामारी कोरोना संकटाशी कंबर कसून दोन हात करावे लागले. मात्र मागील दोन वर्षातही विकास कामे सुरूच होती. कोरोणा महामारीचे संकट आटोक्यात येताच ब्रह्मपुरी मतदार संघातील ग्राम खेडयांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने नागरिकांच्या मुलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करून दिला आहे.
नळ पाणीपुरवठा योजनेच्या भुमीपुजन केलेल्या गावांमध्ये बेलपातळी ३५ लक्ष, मुई ३५ लक्ष, सायगाव ७३ लक्ष, कळमगाव ९८ लक्ष, रामपुरी ३९ लक्ष, शिवसागर तु. ३९ लक्ष, तुलानमेंढा ९८ लक्ष, तुलानमाल ९८ लक्ष, आवळगाव १ कोटी ५० लक्ष, बोडधा १४ लक्ष, कुडेसावली ७० लक्ष, मुडझा १ कोटी ५० लक्ष, हळदा १ कोटी ९५ लक्ष, किटाळी ८९ लक्ष, नवेगाव तु. ७६ लक्ष रू. या गावांचा समावेश आहे.
तर सिमेंट काॅंक्रीट रस्त्यांचे भुमीपुजन मांगली १० लक्ष, बेलपातळी ६ लक्ष, मुई ५ लक्ष, तुलानमेंढा ४ लक्ष, तुलानमाल १० लक्ष, हळदा १० लक्ष, मुडझा ८ लक्ष, भुज १० लक्ष, एकारा १० लक्ष व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सायगाव १ कोटी ६४ लक्ष रुपयांच्या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्राम खेड्यांमध्ये सध्या पूर्णत्वास आलेल्या व सुरू असलेल्या विकास कामांमुळे ब्रह्मपुरी तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात आला असून नागरिकांना शुद्ध पेयजल उत्तम रस्ते व सांडपाणी विल्हेवाटासाठी करण्यात आलेल्या नाल्या त्यामुळे ग्रामीण महिला व नागरिकांमध्ये सर्व स्तरावरून समाधान व्यक्त केले जात आहे