पुणे – पुण्यातल्या लाल महाल ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. सध्या पुणे महापालिकेने उन्हाळ्याच्या सुट्टीत हा लाल महाल पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. अशातच लाल महालात रिल्स काढण्याच्या निमित्ताने सिनेमातील गाण्यांवर आधारित रिल्सचं शुटिंग करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे गाणं त्या ठिकाणी लाल महालात शूट केला आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणावर अनेक राजकीय, सामाजिक आणि कलाविश्वातील लोकांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान, आता पुण्यातील लाल महाल येथे एक महिन्यांपूर्वी सादर करण्यात आलेल्या लावणी प्रकरणी नृत्य करणाऱ्या वैष्णवी पाटीलसह तिघांवर फरासखाना पोलीस स्टेशन येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.