शिवराज्यभिषेक सोहळ्यास मुख्यमंत्र्यासह मान्यवरांची उपस्थिती
शिवराज्यभिषेक सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती तसेच इतर लोकप्रतिनिधी व मान्यवर, मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. मंगळवार 6 जून रोजी देखील सकाळी 8.30 वाजता रायगड किल्ल्याच्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराजांना मानवंदना देण्यासाठी 40 मर्दानी खेळाचे आखाडे
शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी 40 मर्दानी खेळाचे आखाडे रायगडावर येणार आहेत. राज्यभरातील शाहीर देखील यावेळी रायगडावर जागर घालतील. यावेळी गडावर भजन, कीर्तनही असेल
शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. 1,2 जून आणि 5, 6 जून या दिवशी अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावरुन जाता येणार नाही.
गागाभट्ट यांचे सतरावे वंशज करणार शिवराज्याभिषेकाचा विधी
गागाभट्ट यांचे सतरावे वंशज महंत सुधीर दास महाराज हा विधी करणार आहेत. या कार्यक्रमला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू
आज एक जून रोजी गडदेवता शिर्काई पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर छत्रपती शंभू महाराज जयंती उत्सव, गंगासागर पूजन, संध्याकाळी पारंपरिक गोंधळ, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तर दोन जूनला सकाळी 7 वाजता ध्वजारोहन सोहळा, सकाळी 9 वाजता शिवराज्याभिषेक सोहळा, 10.30 वाजता श्री शिवसन्मान सोहळा आणि 11 वाजता शिवपालखी सोहळा होणार आहे.