मुंबई, दि.१५ : वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व संघटनात्मक विकास होण्यासाठी या समाजाच्या विकासासाठी उत्कृष्ट कार्य करणा-या व्यक्ती तसेच संस्थांना देण्यात येणारा ‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार देण्यात येतो. गेले सहा वर्षांचे पुरस्कार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत इतर मागास बहजुन कल्याण विभागामार्फत वितरण होणार आहे अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मागील सहा वर्षापूर्वी ०८ जून २०१६ रोजी 'महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासंदर्भात शासन निर्णय काढला होता. सन २०१६-१७ सन २०१७-१८, सन २०१८-१९, सन २०१९ -२०, सन २०२०-२१, सन २०२१-२२ या सहाही वर्षाचा पुरस्कार वितरण झालेले नव्हते.
सन २०१६-१७ व्यक्ती म्हणून प्रा.मनोहर बाबाराव धोंडे आणि संस्था म्हणून शिवा आखिल भारतीय वीरशैव युवक संघटना,औरंगाबाद,सन २०१७-१८ व्यक्ती म्हणून अभय मनोहर कल्लावार,नागपूर तर संस्था म्हणून वीरमठ संस्थान ता.अहमदपूर,जिल्हा लातूर, सन २०१८-१९ विठ्ठल ताकभिडे,नांदेड,सन २०१९-२० व्यक्ती म्हणून उमाकांत गुरूनाथ शेटे पुणे, संस्था म्हणून महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्था,फुलकळस ता.पुर्णा, जिल्हा परभणी, सन २०२०-२१ व्यक्ती म्हणून रामलिंग बापूराव तत्तापूरे लातूर, संस्था आहे तीर्थक्षेत्र आदीमठ संस्था धारेश्वर,पोस्ट दिवशी खुर्द.ता.पाटण,जिल्हा सातारा, सन २०२१-२२ डॉ.यशवंतराव बाबाराव सोनटक्के,नवी मुंबई,संस्था सारथी प्रतिष्ठान,शिवकृपा बिल्डींग,बसवेश्वर नगर नांदेड या सर्व वर्षांच्या व्यक्ती व संस्थाच्या पुरस्कारांचे वितरण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.संस्था व व्यक्तीची निवड प्रत्येक विभागातून केली जाणार असून संस्थेला ५१ हजार रोख व व्यक्तीला २५ रूपये रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह,शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
तरी या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला या क्षेत्रात कार्य करणारे कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार, समाज संघटक व समाजसेवक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.याबाबतचा शासननिर्णय १३ जून २०२२ रोजी नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे.