‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या चांगलीचं चर्चेत आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. यश-नेहा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. साखरपुडा, संगीत, मेंहेंदी, हळद नंतर प्रेक्षकांना आता यश-नेहाचा शाही विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे. यश-नेहाची रेशीमगाठ अखेर बांधली जाणार आहे. झी मराठीवर 12 जूनला रात्री आठ वाजता दोन तासांचा विवाह विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लग्नसोहळ्याचा प्रोमो नुकताच आऊट झाला आहे. प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रोमोमध्ये नेहा-यश आनंदी दिसत आहेत. परीदेखील उत्साहात दिसत आहे.
यश-नेहा अनेक प्रयत्नानंतर अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्यातले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विश्वजीत आणि मिथिला प्रेक्षकांना लग्नासोहळ्यासाठी खास आमंत्रण देतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. परीच्या आईच्या लग्नाला नक्की यायचं हं, असं म्हणत परीदेखील प्रेक्षकांना आमंत्रण देत आहे.
यश-नेहाचा आता शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. या शाही विवाहसोहळ्याची प्रेक्षक अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. आता येत्या रविवारी प्रेक्षकांना शाही विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे. यश-नेहाचा साखरपुडा, हळद, मेहेंदी, संगीत चाळीत पार पडले होते. त्यामुळे प्रेक्षकांना आता लग्नसोहळ्याची उत्सुकता लागली आहे. यश नेहाच्या आयुष्यात आल्याने नेहाचे आयुष्य बदलले आहे. तसेच परीलादेखील वडीलांचे प्रेम मिळणार म्हणून नेहा आनंदी आहे.