मुंबई, 12 मे : प्रत्येक विविहित स्त्रीसाठी तिचं मंगळसूत्र हे महत्वाचं आहे. हे तिच्या सौभाग्याचं प्रतिक आहे. त्यामुळे विवाहित स्त्री ही मंगळसूत्राशिवाय अपूर्णच आहे. असं म्हटलं जातं. हे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे याला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे. ममंगळसूत्रात काळे मोती धाग्यात बांधलेले असतात. शिवाय ते सोन्याचं देखील असतं.
आजकाल ट्रेंड बदललाय त्यामुळे मंगळसुत्र वेगवेगळ्या प्रकारात आणि आकारात येतं. पण असं असलं तरी देखील मंगळसूत्र वापरण्याचे ज्योतिषशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्याचं पालन करणं गरजेचं आहे. नाहीतर त्याचे विपरित परिणाम देखील पाहायला मिळतात असं सांगितलं जातं.
मंगळसूत्रामधील काळे मणी महादेव आणि देवी पार्वती यांच्यातील बंधनाचे प्रतीक असल्याचे मानले जाते. मंगळसूत्रातील सोने हे माता पार्वतीचे तर काळा मोती हे भोलेनाथाचे प्रतीक असल्याचे मानले जाते. या मण्यांशिवाय मंगळसूत्र अपूर्ण आहे.
ऊर्जेचे प्रतीक असलेल्या मंगळसूत्रात नऊ मणी असतात. हे दुर्गा देवीच्या 9 रूपांचे प्रतिनिधित्व करतात. ते महिलांच्या सौभाग्याचं रक्षण करतात. तसेच वैवाहिक जीवनाला वाईट नजरेपासून वाचवतात. हे मणी हवा, पाणी, पृथ्वी आणि अग्नि या घटकांचे प्रतीक आहेत.
‘मंगळसूत्र’ घालण्याची प्रथा कशी सुरु झाली?
त्यामुळे महिलांनी हे नेहमी लक्षात ठेवा की इतर स्त्रीचे मंगळसूत्र कधीही घालू नये. ज्योतिषशास्त्रानुसार असे करणे अशुभ आहे. हे वैवाहिक जीवनात मतभेद आणि तणाव निर्माण होतो. तसेच मंगळसूत्रात काळे मोती असावेत.
हे मोती पतीला दोषांपासून वाचवतात आणि वय वाढवतात. तर मंगळसूत्रात सोन्याचा वापर केला आहे. सोने बृहस्पति ग्रह मजबूत करते. विवाहित महिला नियमितपणे मंगळसूत्र घालतात, बृहस्पति त्यांना शुभ फल देतो. त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन सुखाने आणि शांततेत पार पडते.
इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती पुरवणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.