युवा नेत्या शिवानी वडेट्टीवार यांचा पुढाकाराने “दोन दिवस विश्रांतीचे, स्रीच्या सन्मानाचे” अभियान
मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील शाळा(Schools), महाविद्यालयात(College) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी(Students) तसेच शासकीय महिला कर्मचारी(Govt. Servants) यांना मासिक पाळीच्या सुरुवातीला दोन दिवसाची पगारी सुट्टी मिळावी, यासाठी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश (Maharashtra Youth Congress) सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार(Shivani Wadettiwar) यांनी पुढाकार घेत सुरु केलेल्या “दोन दिवस विश्रांतीचे, स्रीच्या सन्मानाचे” या अभियानाला संपूर्ण महाराष्ट्रातून(Maharashtra) महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
महिलांच्या मासिक धर्माबाबत(Menstrual Leave) गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी रेंगाळत होती. सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court) देखील याबाबत याचिका प्रलंबित असून पुन्हा एकदा या मागणीने जोर धरला आहे. राज्यात यासाठी युवा नेत्या शिवानी वडेट्टीवार यांनी आता युवती व महिलांच्या सन्मानार्थ पुढाकार घेतला आहे. यापूर्वी बिहार सरकार(Bihar Govt.) १९९२ पासून शासकीय महिला कर्मचाऱ्यांना दोन दिवसाची सुट्टी देत आहे, तर केरळ सरकारने(Kerala Govt.) देखील विद्यार्थिनींना सुट्टी(Leave) देण्याबाबत पावले उचलली आहे. अशातच प्रगतशील म्हणवणाऱ्या आणि देशाला दिशा देणाऱ्या आपल्या महाराष्ट्र(Maharashtra) राज्यात देखील याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षा युवा नेत्या शिवानी वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
मासिक पाळी(Menstrual) ही नैसर्गिक असून अनेक महिलांना सुरुवातीच्या दोन दिवस असह्य वेदना सहन कराव्या लागतात, तसेच या काळात होणारा शारीरिक त्रास आणि मानसिक चिडचिड यापासून आराम मिळावा यासाठी दोन दिवसाची सुट्टी(Two Days Leave) मिळावी, अशी मागणी शिवानी वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) तसेच उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांना पत्राद्वारे केली आहे.
विद्यार्थिनी तसेच महिलांच्या आरोग्याचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महिला तसेच युवती, विद्यार्थिनींच्या सन्मानार्थ युथ आयकॉन शिवानी वडेट्टीवार(Shivani Wadettiwar) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.