धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 22 एप्रिल : मुंबईकरांना रविवार म्हंटलं की रेल्वे प्रवासाचं मोठं टेन्शन असतं. अभियांत्रिकी तसंच अन्य कामांसाठी मुंबई उपनगरीय मार्गावर काही तासांचा मेगा ब्लॉक घेतला जातो. त्यामुळे रेल्वेचंवेळापत्रक बदलतं. मेगा ब्लॉकच्या काळात अनेक गाड्या रद्द असतात. त्यामुळे मुंबईकरांनी रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचलीच पाहिजे. उद्या रविवारी 23 (एप्रिल) रोजी देखील विविध कामांसाठी उपनगरीय विभागात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच, हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / वांद्रे या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
मध्य रेल्वे मेगा ब्लॉक
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 11.05 वाजल्यापासून ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. या ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड स्थानकावर धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. तसेच, नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 या वेळेत अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
रमजान ईदच्या दिवशी मुंबईकरांचा प्रवास सोपा, ‘बेस्ट’ प्रशासनानं दिलं खास गिफ्ट!
हार्बर मार्ग मेगा ब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलकरीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
Latur News: लातूरचा रेन्चो! ठिबक सिंचनासाठी लावलं डोकं, Video पाहून म्हणाल क्या बात है
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना रोजी सकाळी 11.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.