मुंबई, 6 मे : आयपीएल 2023 मधील 49 व्या मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. या मॅचसाठी दोन्ही संघांचे फॅन्स भलतेच उत्साहित आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ ही मॅच जिंकून विजयाची हॅट्रिक करण्यासाठी सज्ज असून चेन्नईचा संघ पॉईंट टेबलमध्ये दुसरे स्थान पटकावण्याची उत्सुक आहे. तेव्हा चेन्नई विरुद्ध मुंबई या महामुकाबल्यासाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा कोणाकोणाला प्लेईंग 11 मध्ये संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
चेन्नई सुपरकिंग्सचे होम ग्राउंड असणाऱ्या एम चिदंबरम उर्फ चेपॉक स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. आयपीएल 2023 च्या सुरुवातीच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने मुंबईचे होम ग्राउंड असलेल्या वानखेडेवर मुंबईचा पराभव करून मॅच जिंकली होती. तेव्हा मागील दोन सामन्यांमुळे जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नईला त्यांच्याच होम ग्राउंडवर पराभूत करेल का हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
6 मे रोजी दुपारी 3:30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून यापूर्वी अर्धातास आधी दोन्ही संघांमध्ये नाणेफेक पारपडेल. मुंबई इंडियन्सने पंजाब आणि राजस्थान विरुद्धच्या मॅचमध्ये 200 पार धावसंख्येचे लक्ष पूर्ण केले होते. तेव्हा कर्णधार रोहित शर्मा मागील दोन मॅचमधील प्लेईंगमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता नाही. मागील सामन्यांमध्ये अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने रिप्लेस केले होते. चेन्नई विरुद्धच्या सामन्यातही अर्जुन तेंडुलकरला प्लेईंग 11 मध्ये संधी संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग 11 :
रोहित शर्मा (कॅप्टन), सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, टिलक वर्मा, सी ग्रीन, पीयूष चावला, अर्शद खान, एन वढेरा, इशान किशन (विकेटकीपर), के कार्तिकेय, जोफ्रा आर्चर
बेंच : टी स्टब्स, एच शोकीन, जेपी बेहरेनडॉर्फ, रमणदीप सिंग, एस संदीप वॉरियर, अर्जुन तेंडुलकर, विष्णू विनोद, डेवाल्ड ब्रेविस, राघव गोयल, रिले मेरेडिथ, एसझेड मुलानी, डी जॅनसेन, आकाश मांडवाल, जेए रिचर्डसन, सीजे जॉर्डन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.