पुणे : गाई, म्हशींच्या दूधवाढीसाठी (Milk Productivity) त्यांना ऑक्सिटोसिन (Oxytocin Injection) हे औषध दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुणे पोलिसांनी उघडकीस आणला. तसेच ऑक्सिटोसिन या औषधांचा साठा करून तो शहर, जिल्ह्यासह राज्यातील गाई-म्हशींच्या मालकांना विक्री करणाऱ्या पश्चिम बंगालमधील टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
Animal Care : जनावरांतील अस्थिव्यंगाचे शास्त्रोक्त उपचार व्हावेत.पुणे पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी पथक, विमानतळ पोलिस ठाणे, अन्न आणि औषध प्रशासन विभाग (एफडीए) यांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये तब्बल ५३ लाख ५२ हजार रुपये किमतीचा ऑक्सिटोसिन औषधांचा साठा जप्त करण्यात आला.
समीर अन्वर कुरेशी (वय २९, रा. कलवड वस्ती, लोहगाव), बिश्वजित सुधांशू जाना (वय ४४, रा. पुरबा बार, विलासपूर, पुरबा मदीनीनपूर, पश्चिम बंगाल), मंगल कनललाल गिरी (वय २७, तिराईपूर, पश्चिम बंगाल), सत्यजित महेशचंद्र मोन्डल (वय २२, रा. नबासन कुस्तीया पंचायत, पश्चिम बंगाल) आणि श्रीमंता मनोरंजन हल्दर (वय ३२, रा. नलपुरकुर, मंडाल, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
Animal Care: आला हिवाळा जनावरांना सांभाळा
त्यांच्याविरुद्ध संगमनत करून फसवणूक, प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देणे तसेच विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकारी सुहास सावंत यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील कलवड वस्ती येथे गाई, म्हशी यांचे दूध वाढीसाठी (पाणवणे) ऑक्सिटोसिन औषधांचा वापर केला जात असून या औषधाचा बेकायदा साठा करून ठेवल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी याबाबत ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली.