बहुजन नेते नामदार संजय राठोड यांचे बंजारा समाजासह इतर मागासवर्गीय समाजाकडून जोरदार स्वागत
गेल्या अनेक दिवसापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला.या मंत्रिमंडळात सामाजिक समिकरणांसह इतर गोष्टींचा विचार करून अनेकांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले.
बंजारा समाजातून येणारे बहुजन समाजातील नेते संजय राठोड यांचादेखील समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला.
संपूर्ण बंजारा समाज हा संजय राठोड यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो हे अनेक वर्षापासून महाराष्ट्राने पाहिले आहे.
त्यांच्यातील हीच क्षमता लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा जनसेवेची संधी उपलब्ध करून दिली आहे.
त्यांना संधी मिळाल्यामुळे संपूर्ण समाजात आनंदाचे वातावरण असून ठिकठिकाणी त्यांचा जल्लोष केला जात आहे.