मुंबई : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंगावायला लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर 6 NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तर समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळ सक्रीय झालं आहे. 130 किमी ताशी वेगानं वारे वाहात आहेत. बंगालच्या उपसागरातील मोचा वादळ शुक्रवारपर्यंत रौद्र रुप धारण करू शकतं. त्यामुळे अंदमान बेटांसह देशातील विविध किनारपट्टीच्या राज्यांमध्ये जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावरील तीव्र दाबाचं ‘मोचा’ चक्रीवादळात रूपांतर झालं असून समुद्रकिनाऱ्याजवळच्या भागांमध्ये अलर्ट देण्यात आला आहे. मोका आज मध्यरात्रीपर्यंत तीव्र चक्री वादळात बदलण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बांगलादेश आणि म्यानमारमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Cyclone Mocha Interesting Facts : देशावर घोंगावणाऱ्या चक्रीवादळाला मोचा हे नाव कसं पडलं?
आयएमडीने सांगितले की ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. नागरिकांनी समुद्रकिनाऱ्याजवळ जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. 13 मे रोजी अंदमानमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. १३ आणि १४ मे रोजी चक्रीवादळाचा वेग हळूहळू कमी होईल असंही सांगितलं आहे.
12 मे रोजी चक्रीवादळाचं भयंकर रुप पाहायला मिळू शकतं. चक्रीवादळाचा परिणाम देशातील काही राज्यांमध्ये होणार आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तर समुद्रकिनाऱ्यालगच्या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ओडिसा, पश्चिम बंगालमधील प्रशासन अलर्टवर आहे.
मोचा चक्रीवादळाचा धोका, कसं ठरवलं जातं चक्रीवादळाचं नाव?
जागतिक हवामान संघटना (WMO) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड द पॅसिफिक (ESCAP) च्या सदस्यांनी एका यादी तयार केली आहे. या यादीमध्ये देशांची नाव आहे. प्रत्येक देश एका एका चक्रीवादळाला नाव देतो. यामध्ये भारताचाही समावेश आहे. मात्र सध्याच्या चक्रीवादळाचं नाव भारताने सुचवलेलं नाही.
येमेनने या चक्रीवादळाचे नाव लाल समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘मोचा’ या बंदराच्या नावावरुन सुचवलं आहे. त्यामुळे या देशानं चक्रीवादळाला मोचा हे नाव दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.