मेष (Aries) : आजचा दिवस चांगला नाही. मोठे निर्णय घेणं टाळा. ऑनलाइन फसवणूक घडू शकते. अगदी ऑफिसमधल्या प्रत्येकावरही विश्वास ठेवू नका.
उपाय : गरीब व्यक्तीला लाल फळ दान करा.
वृषभ (Taurus) : आर्थिक परिस्थिती सुधारेल. गुंतवणूक करणं चांगलं राहील. आज प्रॉपर्टीच्या अनुषंगाने नफा मिळेल. ऑफिसमध्ये आदर मिळेल.
उपाय : गरीब व्यक्तीला अन्नदान करा.
मिथुन (Gemini) : आजचा दिवस फायद्याचा ठरेल आणि तुम्हाला नफा होईल. भौतिक सुखसोयींच्या गोष्टींवरचा खर्च जास्त असेल. बजेट आखलंत तर फायद्याचं ठरेल.
उपाय : भगवान शिवशंकराला जल अर्पण करा.
कर्क (Cancer) : आजचा दिवस तुम्हाला आर्थिक शक्ती देईल. तुमचे पैसे कुठे अडकले असतील, तर ते आज परत मिळू शकतील. शहाणपणाने घेतलेले निर्णय नफा देतील.
उपाय : श्री हनुमानाची आरती करा.
सिंह (Leo) : भविष्यातल्या मोठ्या प्लॅन्ससाठी आजपासूनच पैशांच्या बचतीला सुरुवात करा. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून काही लाभ होईल. तज्ज्ञाचा सल्ला घेतल्यास योग्य ठिकाणी गुंतवणूक करू शकाल. त्यातून आर्थिक नफा होईल.
उपाय : हनुमान चालिसा पठण करा.
कन्या (Virgo) : आज तुमच्या जुन्या प्लॅन्सवर पुन्हा काम सुरू होऊ शकतं. पैशांच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवण्याच्या आधी सावधगिरीने विचार करा. जुनी रखडलेली कामं थोडाफार खर्च करून पूर्ण केली जाऊ शकतात.
उपाय : गायीला पोळी/भाकरी खाऊ घाला.
रामायण टीव्हीवर दिसण्यासाठी पडद्यामागे इतका झाला होता खटाटोप; 2 वर्षे चालला वाद
तूळ (Libra) : आज खर्च वाढतील. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याची स्थिती उद्भवेल. कौटुंबिक चिंता सतावतील. काही आजारांच्या उपचारांवर खर्च होईल. एकंदरीत दिवस अडचणींचा असेल.
उपाय : गरीब व्यक्तीला अन्नदान करा.
वृश्चिक (Scorpio) : व्यावसायिकांना आज नफ्याचं डील मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तीचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असलेल्यांना चांगले पर्याय उपलब्ध होतील.
उपाय : गरीब व्यक्तीला लाल फळ दान करा.
मे महिन्यात 3 मोठ्या ग्रहांचे राशीपरिवर्तन; या 6 राशींना संपूर्ण महिना आनंदी
धनू (Sagittarius) : आज पूर्वजांच्या प्रॉपर्टीतून लाभ मिळेल. कोणालाही अनाहूत सल्ला देऊ नका. कुटुंबीयांसमवेत कुठे तरी पिकनिकला जाऊ शकता.
उपाय : सुंदरकांडाचं पठण करा.
मकर (Capricorn) : आज ज्ञानापासून लाभ होईल. ऑफिसमधले सहकारीही तुम्हाला साथ देतील. चांगल्या कामांवर खर्च केल्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या प्रसिद्धीत वाढ होईल.
उपाय : गरीब व्यक्तीला लाल फळ दान करा.
या चुकीच्या सवयींमुळे कुंडलीत सूर्याची ग्रहस्थिती होते कमकुवत; अडचणी वाढतात
कुंभ (Aquarius) : आज नशीब तुमच्या बाजूने आहे. आज तुमच्या संपत्तीत वाढ होईल. कुठेही अडकलेले पैसे परत मिळतील. आज ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद, भांडण टाळावं.
उपाय : श्री हनुमानाची आरती करा.
मीन (Pisces) : उत्पन्नवाढीसाठी केलेले प्रयत्न आज यशस्वी होतील. उत्पन्नाचे चांगले स्रोत मिळाल्यामुळे संपत्तीत वाढ होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
उपाय : सुंदरकांडाचं पठण करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.