पालकमंत्री संजय राठोड यांची उपस्थिती
Yavatmal : शिवसेना (Shivsena) पक्ष तसेच बोधचिन्ह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात तरुणांचा शिवसेनेकडे ओढा वाढला आहे. यवतमाळ (Yavatmal) शहरातील जवळपास दीडशे पेक्षाही जास्त तरुणांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच शिवसेनेचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या उपस्थितीत युवासेनेत (Yuvasena) प्रवेश केला. एवढया मोठया संख्येत तरुणांनी युवासेनेत प्रवेश करुन सामाजिक कार्यात (Social Work) स्वतःला झोकुन देण्याचे वचन दिले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या प्रमुख उपस्थितीत यवतमाळ (Yavatmal) येथे सौरभ तिवारी, प्रशिक गंडलीक यांच्यासह कौस्तुक ढोके, स्वप्निल बोबडे, कन्हैया डिके, मल्हार चोरमुले, सुजल कावडे, मोहित पराडे, साहिल शेंडे, यश राऊत, निशांत गजलवार, रहीम सोराठीया, शुभम गेडाम, विशाल वाकोडे, अनुज फुलझले, आकाश गायकवाड, आकाश टेकाळे, अंकुश कावडे यांच्यासह शेकडो सहकाऱ्यांनी शिवसेनेच्या युवा सेनेत (Yuvasena) प्रवेश केला.
सौरभ तिवारी तसेच प्रशिक गंडलीक हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहतात. जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच शिवसेनेचे नेते संजय राठोड, माजी जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, युवासेनेचे संपर्क प्रमुख विशाल गणात्रा यांचे सामाजिक कार्य बघून सौरभ तिवारी तसेच प्रशिक गंडलीक यांनी सुध्दा आपल्या समर्थक मित्रांसह युवासेनेत (Yuvasena) प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने युवासेना संपर्क प्रमुख विशाल गणात्रा यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. स्थानिक विश्रामगृह येथे दीडशे पेक्षा अधिक तरुणांच्या गळयात भगवे शेले टाकून त्यांना युवासेनेत प्रवेश देण्यात आला. याप्रसंगी युवासेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व ना. संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या नेतृत्वात शिक्षण, आरोग्य, रोजगार, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याचा मनोदय युवकांनी (Youth) व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे (Shivsena) संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, माजी जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, उपजिल्हाप्रमुख प्रवीण निमोदीया, तालुका प्रमुख योगेश वर्मा, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी आकाश राठोड, महेश पवार, निरव गढीया, हितेश खाळपाडा, शुभंकर भट्ट आकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
सामाजिक जाणीव महत्वाची
यावेळी पालकमंत्री ना. संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी आम्ही युवासेनेच्या (Yuvasena) माध्यमातून तरुणांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासोबतच क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणीक स्पर्धांचे आयोजन करून तरुणांना दिशा देण्याचा प्रयत्न युवासेनेच्या माध्यमातून सुरु आहे. देशाचे भविष्य असलेला तरुण जीवनात भरकटता कामा नये यासाठी युवासेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.