जितेंद्र जाधव, प्रतिनिधी
पुणे, 14 मे : आज सगळीकडे मातृत्व दिन साजरा केला जात असतानाच दुसरीकडे पुरंदर तालुक्यातील सोन्याच्या नीरा गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. निरा येथील एका दवाखान्यात बेकायदेशीर गृहपात केला गेल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांनी डॉ. सचिन रामचंद्र रणवरे याच्यासह जिचा गर्भपात झाला ती दिपाली थोपटे व बरकडे नावाचा एजंट अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
तुमच्या शहरातून (पुणे)
यासंदर्भात जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हा शलचिकित्सक डॉ. नागनाथ संग्रामआप्पा यम्पल्ले यांनी जेजुरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला राजाच्या कुटुंब कल्याण कार्यालयाकडून गोपनीय ईमेल आला होता.
हा ई-मेल 12 मे रोजी आला होता. त्यामध्ये पुरंदर तालुक्यातील पिसुर्डी या गावांमध्ये बरकडे नावाचा एजंट असून तो निरा गावातील डॉक्टर सचिन रणवरे यांच्या श्रीराम हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर रित्या गर्भपात करत असल्याची माहिती दिली होती.
दरम्यान, 14 मे रोजी डॉक्टर सचिन रणवरे हा डॉक्टर दिपाली थोपटे नावाच्या गर्भवती महिलेचा गर्भपात करणार असल्याची माहिती देखील या ईमेलवर आली होती. या महिलेस पहिली मुलगी असून बेकायदेशीर रित्या गर्भलिंग निदान केल्यानंतर नीरा येथील बारामती रस्त्यावरील श्रीराम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रणवरे हा तिचा गर्भपात करणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार डॉक्टर यम्पल्ले हे विधी सल्लागार अॅड. मेघा सतीश सोनतळे यांच्यासह श्रीराम हॉस्पिटल येथे आज रविवारी पोहोचले. या ठिकाणी दवाखान्यात गेल्यानंतर डॉ. सचिन रणवरे यांचे वडील राम रणवरे या ठिकाणी होते. त्यांना डॉक्टर यम्पल्ले यांनी आपली ओळख सांगितली व त्यानंतर 14 मुद्द्यानुसार दवाखान्याची तपासणी केली.
दवाखान्याच्या गर्भपात केंद्र व सोनोग्राफी केंद्राची तपासणी केली. त्यावेळी रजिस्टर मध्ये दिपाली थोपटे हे नाव नव्हते. मात्र, दिपाली थोपटे यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन केल्यानंतर थोपटे यांच्याकडील नातेवाईकाने शनिवारी संध्याकाळीच गर्भपात केला असल्याची माहिती दिली. हा गर्भपात डॉ. सचिन रणवरे याने केला असून त्यासाठी बरकडे नावाच्या एजंटने गर्भलिंग निदान केले असल्याची माहिती देखील मिळाली.
त्यानंतर डॉ. एमपल्ले यांनी पुन्हा डॉ. सचिन रणवरे याच्याकडे चौकशी केली, त्याने दिपाली थोपटे यांचे अर्धवट भरलेले अर्ज व इतर माहिती डॉक्टर यांच्याकडे दिली. त्यातून या ठिकाणी बेकायदेशीर रित्या गर्भात झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.