मुंबई सिटी एफसीने इतिहास रचला आहे. या संघाने एएफसी चॅम्पियन्स लीगम इराकी एअर फोर्स क्लबचा 2-1 असा पराभव केला. यासह, मुंबई सिटी एफसी एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये सामना जिंकणारा पहिला भारतीय फुटबॉल संघ ठरला आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील किंग फहद स्टेडियममध्ये सोमवारी (11 एप्रिल) रोजी हा सामना पार पडला. मुंबई सिटी एफसीने एक गोलच्या फरकाने नवा विक्रम रचला आहे. विशेष म्हणजे इराकी एअर फोर्स क्लब तीन वेळा AFC कप विजेता आहे.
इराकी एअर फोर्सच्या हमादी अहमदने 59 वा गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र मुंबईच्या दिएगो मॉरिसिओने 70व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर राहुल भेकेने 75 व्या मिनिटाला विजयी गोल केला. मुंबई सिटी एफसीची पुढील सामना आता गुरुवारी 14 एप्रिलला अल जझीरासोबत आहे. या दिवशी एअरफोर्स क्लबचा सामना आता अल शहाबश होणार आहे.
मुंबईचा पहिल्या सामन्यात पराभव
याआधी मुंबई सिटीला या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अल शहाबकडून 3-0 असा पराभव पत्करावा लागला होता. मुंबई सिटी एफसीला एएफसी चॅम्पियन्स लीग फुटबॉल पदार्पणाच्या सामन्यात सौदी अरेबियाच्या अल शबाबकडून 0-3 असा पराभव पत्करावा लागला.
हाफ टाईमनंतर बदलला खेळ
इराकी एअरफोर्स क्लबविरुद्ध मुंबईने पहिल्या सामन्याप्रमाणेच खेळाची सुरुवात केली. मात्र इराकने मुंबईला पहिल्या 10 मिनिटांतच दोन चुका करण्यास भाग पाडलं. हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत सुरू होती. हाफ टाईमनंतर मुंबईने बाजी मारली.