मुंबई : मुंबईकरांच्या आयुष्यात लोकल ट्रेन्सना खूप महत्त्वाचं स्थान आहे. एवढ्या मोठ्या शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी सर्वाधिक वापर लोकलचा होतो. रोज कोट्यवधी प्रवासी लोकलने प्रवास करत असतात. मुंबईकरांच्या आयुष्याची कल्पना लोकल ट्रेन्सशिवाय होऊच शकत नाही. अशातच या लोकल ट्रेन्स लवकरच बंद होतील, असं म्हटलं तर. लोकल ट्रेन्स बंद होण्याचा नेमका विषय काय ते जाणून घेऊयात. या संदर्भात ‘बिझनेस टुडे’ने वृत्त दिलंय.
मुंबईकरांच्या आयुष्याची लाइफलाइन असलेल्या मुंबई लोकल ट्रेन्स लवकरच बंद होऊ शकतात. त्याची जागा वंदे भारत मेट्रो ट्रेन्स घेतील. कारण रेल्वे बोर्डाने शुक्रवारी उपनगरीय रेल्वे नेटवर्क अपग्रेड करण्यासाठी 238 वंदे भारत मेट्रो गाड्या खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने या संदर्भात वृत्त दिलं आहे.
मुंबईतील उपनगरीय ट्रेन नेटवर्कची क्षमता वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या देखरेखीखाली महत्त्वाकांक्षी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-III (MUTP-III) आणि 3A (MUTP-3A) चा भाग म्हणून हे रेक विकत घेतले जातील, असं मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
तुमच्या शहरातून (मुंबई)
“या गाड्यांचं उत्पादन टेक्नॉलॉजी पार्टनरद्वारे केले जाईल आणि केंद्राच्या इंटर्नल ट्रेड व प्रमोशन इंडस्ट्री अंतर्गत मेक इन इंडिया मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केले जाईल. या ट्रेन्सची खरेदी MRVC द्वारे केली जाईल आणि ती 35 वर्षांच्या मेंटनन्स रिक्वायरमेंट्ससह असेल,” असं एमआरव्हीसी प्रवक्ता म्हणाला.
टेक्नॉलॉजी पार्टनर MUTP-III आणि 3A अंतर्गत आधीच मंजूर झालेल्या रेकच्या देखभालीसाठी दोन डेपो तयार करेल, असं अधिकाऱ्याने सांगितलं. MUTP-III आणि MUTP-3A या प्रोजेक्ट्सची किंमत अनुक्रमे 10,947 कोटी रुपये आणि 33,690 कोटी रुपये आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, वंदे भारत मेट्रो हा एक अत्याधुनिक रेक असेल, जो सुमारे 100 किलोमीटर अंतरावरील शहरांना कव्हर करण्यासाठी तयार केला जाईल.
एक्स्प्रेसच्या तिकीटावर लोकलने प्रवास करता येतो का?
वंदे भारत मेट्रो भारतातील पहिली स्वदेशी सेमी-हाय-स्पीड ट्रेन – वंदे भारत एक्सप्रेसचं मिनी व्हर्जन आहे. त्याची घोषणा 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती, ज्यामध्ये अत्याधुनिक रेक कमी अंतरासाठी तयार केला जाईल. या माध्यमातून 100 किलोमीटर अंतरापर्यंतची शहरं कव्हर केली जातील.
कोकणवासियांसाठी खुशखबर! 29 मे पासून धावणार वंदे भारत एक्स्प्रेस
‘इंडियन एक्सप्रेस’च्या रिपोर्टनुसार, पश्चिम रेल्वे (WR) आणि मध्य रेल्वे (CR) द्वारे चालवले जाणारे दोन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर 319 किलोमीटर अंतर व्यापतात आणि AC लोकलसह 3,129 सर्व्हिसेस पुरवतात.
मनू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.