धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 11 एप्रिल : लोककला आणि लोककलाकार ही महाराष्ट्राची शान आहे. आपला इतिहास, आपली परंपरा, समाजमन हे सारं काही या माध्यमातून प्रतित होते. सध्याच्या आधुनिक काळात या लोककला प्रवाहापासून दूर गेल्या आहेत. त्यानंतरही काही मंडळी आजही या लोककला टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी झटत आहेत. नवी मुंबईचा विनय नातेकर हा देखील यापैकी एक आहे.
परंपरा जपणारा कलाकार
तुमच्या शहरातून (मुंबई)
आदिम काळात जेव्हा मनोरंजनाची साधनेच नव्हती. तेव्हा कल्पनेला वाव देत एक संपन्न कला बहरली होती. आज माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जाळ्यात ही कला इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. ही कला म्हणजे बाहुल्यांची परंपरा… सध्याच्या टेक्नोलॉजीच्या काळात विनय ही कला सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.
विनय सांगतो की, ‘त्याला लहापणापासून विविध आवाज काढण्याची आवड होती. नक्कल करत असायचा. तीच कला शिकत त्याने बाहुल्यांच्या कलेवर लक्ष केंद्रीत केलं.’ विनयनं 2018 साली या क्षेत्रात पदार्पण केलं. गेल्या चार वर्षांपासून तो या क्षेत्रात पूर्णवेळ काम करत आहे. त्यानं यापूर्वी ग्राफिक डिझायनिंग, व्हॉईस आर्टिस्ट, स्टॅण्डअप कॉमेडी, अशी वेगवेगळी कामं केली आहेत. विघ्नेश पांडे या कलाकाराला बघून प्रेरणा घेतल्याचं विनय यावेळी म्हणाला.
रमजानमध्ये मिठाई खाण्यासाठी मुंबईतील ‘या’ दुकानात जायला हवं, राजीव गांधींनीही केलाय गौरव
‘बोलक्या बाहुल्यांच्या कलेबाबत आजही जागृती खूप कमी आहे. यापूर्वी टीव्ही, मोबाईल अशी मनोरंजनाची साधनं नव्हती तेंव्हा ही कला जोरात होती. आता या क्षेत्रातील मोजकेच कलाकार शिल्लक आहेत. ही कला लुप्त होत जात असल्याची खंत विनयला सतावतेय. त्यामुळे तो दृकश्राव्य माध्यमातून किंवा प्रत्यक्ष मोफत शिबिरातून या कलेचं संवर्धन करण्याचं काम करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.