नुपूर पाटील, प्रतिनिधी
मुंबई, 3 एप्रिल : एप्रिल महिना आता सुरू झालाय. आगामी दोन महिना मुंबईसह सर्वत्र कडक उन्हाळा असतो. वाढत्या उन्हापासून स्वत:चं संरक्षण खरेदी करण्यासाठी उन्हाळी टोपी खरेदी केले जाते. घरातून बाहेर पडताना डोक्याचं संरक्षण करण्यासाठी याचा मोठा उपयोग होतो.मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधील बाजारपेठेत अगदी 6 महिन्यांच्या बाळांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगाटाला साजेशा अशा आकर्षक आणि वेगवेगळ्या आकाराच्या टोप्या कमी किंमतीमध्ये उपलब्ध आहेत.
या मार्केटमध्ये अगदी 6 महिन्यांच्या बाळापासून ते मोठ्या व्यक्तींसाठी विविध रंगी बेरंगी कॅप्स, हॅट्स बाजारपेठेत उपलब्ध आहेत. या कॅप्स आणि हॅट्स वेगवेगळ्या आकारात, डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे लहान मुलं आणि तरुणाई या टोप्यांकडे आकर्षित होतात.
तुमच्या शहरातून (मुंबई)
कोणते प्रकार उपलब्ध ?
क्रॉफर्ड मार्केटमधील बाजारा वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या आणि अनेक डिझाईन असलेल्या टोप्या मिळतात. या कॅप्सची किंमत बार्गेनिंग करून बरीच कमी करता येते. त्यामुळे ग्राहकांचं कॅप्स खरेदी करण्यासाठी हे आवडतं ठिकाण आहे.
क्रॉफर्ड मार्केटमध्ये ‘या’ ठिकाणी खरेदी करा सर्वात स्वस्त दागिने, Video
कोणत्या टोप्यांना जास्त मागणी?
येथे पेस्टल कलरच्या अनेक कॅप्स पहायला मिळतात. गुलाबी, ऑरेंज, व्हाईट असे असंख्य रंग या कॅप्सचे उपलब्ध आहेत तसेच खास कॉटनचं अस्तर असणाऱ्या कॅप्सला जास्त मागणी आहे. गोल हॅट्स, विविध कार्टून्स, बार्बी डिझाईन असणाऱ्या कॅप्सला लहान मुलींची मागणी आहे.आर्मी डिझाईन, व्हाईट अश्या सिम्पल कॅप्स आणि हॅट्स खरेदी करण तरुण पसंत करताहेत. त्यात सिक्वेन्सच्या कॅप्स सुद्धा उपलब्ध आहेत. झगमग कॅप्स सध्या जास्त ट्रेंड मध्ये आहेत, अशी माहिती येथील विक्रेत्यांनी दिली.
काय आहे किंमत?
100 रुपये ते 250 रुपयांपर्यंत येथे कॅप्स उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या कॉटनच्या तसंच त्यावर विविध टॉईज असलेल्या कॅप्स 200 रुपयांना येथे आहेत. याची किंमत कमी करून मिळत असल्यानं ग्राहकांची इथं मोठी गर्दी असते. या बाजारपेठेत या कॅप्सची अगदी लहान-लहान दुकानंही आहेत.
सध्या उन्हाळ्यामुळे कॉटनच्या कॅप्स खरेदी करण्याला ्ग्राहकांनी पसंती दिलीय. वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कॅप्स आवश्यक आहे. ती खरेदी करण्यासाठी ग्राहक इथं येतात. या बाजारामध्ये कमी किंमतीत चांगल्या टोप्या मिळतात, अशी माहिती विक्रेता परवेज खान यांनी दिली.
गूगल मॅपवरून साभार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.