पुणे – पंतप्रधानांच्या हस्ते होणार जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानाच्या विश्वस्तांना घेऊन आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेऊन त्यांना आमंत्रण दिले होते. आता हेच आमंत्रण पंतप्रधानांनी स्विकारले असून १४ जूनला पंतप्रधान देहूत येणार आहेत.
आचार्य तुषार भोसले यांनी याबाबत ट्वीट केले आहे. यात ते म्हणतात, महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक क्षण आहे. इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहु येथे येणार आहेत. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी दि. १४ जून रोजी करणार जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.