ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने शनिवारी फिनलंडमधील कुओर्तने गेम्समध्ये भालाफेक स्पर्धेत विद्यमान विश्वविजेत्या ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सचा चार दिवसांत दुसऱ्यांदा पराभव केला. 24 वर्षीय नीरजने 86.69 मीटरच्या प्रयत्नाने पदक जिंकले.
हे अंतर त्याने पहिल्याच प्रयत्नात गाठले तर त्याचा दुसरा आणि तिसरा प्रयत्न फेल झाला. त्यानंतर त्याने आणखी भाले फेकले नाही. त्रिनिदाद आणि टोबॅगोचा 2012 ऑलिम्पिक चॅम्पियन केशॉर्न वॉलकॉट हा 86.64 मीटरसह दुसरा तर, पीटर्सने 84.75 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह तिसरे स्थान पटकावले.
नीरजने याआधी फिनलंडमधील तुर्कू येथे झालेल्या पावो नुर्मी गेम्समध्ये ८९.३० मीटरच्या प्रयत्नात रौप्यपदक जिंकले होते. ३० जून रोजी स्टॉकहोम येथे होणाऱ्या डायमंड लीगपूर्वी या विजयामुळे त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.